Shaktiman : शक्तिमान परतणार! पहिल्या भारतीय सुपरहिरोचं दमदार कमबॅक, मुकेश खन्ना यांनी शेअर केली पहिली झलक
Return of Shaktiman : शक्तिमान टीव्ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी परतणार आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनी पहिली झलक शेअर केली आहे.
Shaktiman Comeback : 90 च्या दशकातील लहान मुलांना अक्षरक्ष: वेड लावणार शक्तिमान पुन्हा एकदा परतणार आहे. लहान मुलांचा भारताचा पहिला सुपरहिरो 'शक्तिमान' दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनी शक्तिमान मालिकेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुकेश खन्ना यांनी शक्तिमान मालिकेचा टीझर शेअर करत चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शक्तिमानचा टीझर शेअर करत याची माहिती दिली आहे. शक्तिमान शोच्या नव्या टीझरमध्ये जुन्या शोच्या काही क्लिप दाखवण्यात आल्या आहेत.
शक्तिमान परतणार!
अभिनेते मुकेश खन्ना यांनी त्यांच्य यूट्यूब चॅनेलवरुन शक्तिमान मालिकेचा टीझर शेअर केला आहे. मुकेश खन्ना यांनी भीष्म इंटरनॅशनल या त्यांच्या यूट्यूब चॅनलवर 'शक्तिमान' परतणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. 'शक्तिमान'चा नवीन टीझर शेअर करताना त्यांनी लिहिलंय की, तो परतण्याची वेळ आली आहे. शक्तिमान परतणार असल्याने चाहते फार खूश आहेत. 90 च्या दशकात शक्तिमान मालिकेला खूप पसंती मिळाली होती.
भारताच्या पहिल्या सुपरहिरोचं दमदार कमबॅक
90 च्या दशकात 'शक्तिमान' च्या रुपात पहिला सुपरहिरो मिळाला होता. 1997 ते 2005 या दरम्यान शक्तिमान मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. 90 च्या दशकात या मालिकेने लहान मुलांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मुकेश खन्ना यांनी काही काळापूर्वी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलं होतं, या मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. लवकरच, 'शक्तिमान'चे चाहते त्यांच्या बालपणीच्या आणि भारताच्या पहिल्या सुपरहिरोला पुन्हा पाहू शकतील. मात्र, लोकांमध्ये तो कधी प्रसारित होणार हे अद्याप कळलेले नाही.
मुकेश खन्ना यांची मोठी घोषणा
मुकेश खन्ना यांच्या भीष्मा इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनलवर याचा एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये असं लिहिलं आहे की, आजकाल अंधार आणि वाईट गोष्टी मुलांवर वर्चस्व गाजवत आहेत, अशा परिस्थितीत भीष्म इंटरनॅशनलने भारताचा पहिला सुपर टीचर, सुपरहिरो परत आणला आहे. या व्हिडीओमध्ये पुढे, मुकेश खन्ना स्वातंत्र्यासाठी एक गाणं गाताना दिसत आहेत, ज्याच्या ओळी आहेत 'आझादी के दिवानो ने जंग लडी फिर जाने दी, अंग अंग काट गए मगर पर आंच वतन पर ना आने दी'.
मुकेश खन्ना यांनी शेअर केली पहिली झलक
महत्त्वाच्या इतर बातम्या :