Bollywood Actor : 'इंटिमेट सीन्स करणं भारतीय संस्कृतीला शोभणारं नाही, या बाबतीत मी सलमानसारखा'; मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य
Bollywood Actor on Intimate Scenes : हिंदी मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याने इंटिमेट सीन्सवर भाष्य केलं आहे. सध्या त्याच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
Bollywood Actor on Intimate Scenes : हिंदी मालिकाविश्वातून अभिनेता शक्ती अरोरा (Shakti Arora) प्रसिद्धीझोतात आला. या अभिनेत्याला 'गुम हे किसी के प्यार में' आणि 'कुंडली भाग्य' यांसारख्या कार्यक्रमांमधून विशेष पसंती मिळाली. छोट्या पडद्यानंतर आता शक्तीला ओटीटी माध्यमांवर पाऊल ठेवायचं आहे. पण ओटीटीवर काम करताना या अभिनेत्याने एक अट ठेवली आहे.
ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. तसेच मी स्क्रिनवर बोल्ड सीन्स करणार नाही, असं स्पष्ट मत देखील या अभिनेत्याने व्यक्त केलंय. तसेच त्याने स्वत:ची तुलना सलमान खानसोबत केलीये.
शक्तीने काय म्हटलं?
शक्तीने या सगळ्यावर भाष्य करत म्हटलं आहे की, जेव्हा बोल्ड सीन्सच्या बाबतीत मी अगदी सलमान खानसारखा आहे. मला स्क्रीनवर किसिंग सीन देणं अजिबात आवडत नाही. तसेच मला इंटिमेट सीन्स करण्यापासूनही लांबच असतो. मला असं वाटतं की, इंटिमेट सीन्स करताना भारतीय अगदी वाईट दिसतात. पण जेव्हा परदेशी कलाकार असे सीन्स करतात, तेव्हा ते अजिबात चुकीचं वाटत नाही.
म्हणून मी इंटिमेट सीन्स करत नाही - शक्ती अरोरा
तसेच या अभिनेत्याने ओटीटी सीरिजवरही भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, जेव्हा भारतीय कलाकार ओटीटीवर इंटिमेट सीन्स करतात तेव्हा ते अजिबात चांगलं वाटत नाही. त्यामुळे मी ओटीटी कार्यक्रम देखील पाहत नाही. मला इंटिमेट सीन्स आवडतही नाहीत आणि ते मला करायचे देखील नाहीत. पण वेळचं काही सांगू शकत नाही.
पण कदाचित मी त्यासाठी इंटिमेट सीन्स करेन - शक्ती अरोरा
पुढे बोलताना त्याने म्हटलं की, जर येणाऱ्या दिवसांमध्ये माझ्याकडे काही काम नसेल आणि मोठा अमाउंट ऑफर झाली तर मी कदाचित इंटिमेट सीन्स करेन. पण मी पूर्ण प्रयत्न करेन की असे सीन्स मी कधीही करणार नाही. ओटीटीवर या सगळ्याला काही नियम असावेत, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे अजिबात योग्य वाटत नाही.
View this post on Instagram