VIDEO: "प्रभू रामाने दर्शन द्यावे"; चिमुकलीच्या गोड आवाजानं तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध!
Rucha Ghangrekar: एका चिमुकलीच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ही मुलगी "प्रभू रामाने दर्शन द्यावे" हे गाणं गाताना दिसत आहे.

Rucha Ghangrekar: आज संपूर्ण देशात राममय वातावरण झाले आहे. आज अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्री रामाच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. अनेक जण आज प्रभू श्री रामाची गाणी, भजने ऐकत आहेत. अशातच एका चिमुकलीनं गायलेलं राम भजन ऐकून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. या चिमुकलीच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ही मुलगी "प्रभू रामाने दर्शन द्यावे" हे गाणं गाताना दिसत आहे. रामाचं गीत गाणारी ही चिमुकली कोण आहे? जाणून घेऊयात...
ऋचानं गायलेलं गाणं ऐकून व्हाल मंत्रमुग्ध!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील मुलीचं नाव ऋचा अभय घांग्रेकर आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमात ऋाचानं सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात ऋचानं अनेक गाणी सादर केली. ऋचा तिच्या गोड आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
होम मिनिस्टर कार्यक्रमात ऋचानं गायलं गाणं
होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये ऋचानं हजेरी लावली होती. यावेळी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनी ऋचाला गाणं म्हणून दाखवण्याची विनंती केली. त्यावेळी ऋचानं "प्रभू रामाने दर्शन द्यावे" हे गाणं गालयलं.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये ऋचानं सांगितलं, "माझे बाबा किर्तन करतात. तेव्हा त्यांनी एकदा प्रथमेश दादानं ( प्रथमेश लघाटे) गायलेलं पद ऐकलं. ते पद बाबांना खूप आवडलं. माझे बाबा ते पद सारखं गुणगुणत होते. मग मी बाबांना विचारलं की तुम्ही हे कोणते पद म्हणत आहात. मग बाबांचं ऐकून-ऐकून मी पण गुणगुणायला लागले."
अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त नुकताच ऋचाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ती "अविरत ओठी यावे नाम श्री राम जय राम जय जय राम" हे गाणे गाताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
