एक्स्प्लोर

Movie: 'या' चित्रपटात रामाची आणि सीतेची भूमिका एकाच मराठमोळ्या व्यक्तीनं साकारली; चित्रपटाची कमाई बैलगाडीतून पोती नेईपर्यंत झाली!

Movie: रामायणावर आधारित असणाऱ्या 107 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या एका चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात, ज्यामध्ये राम आणि सीता मातेची भूमिका एकाच मराठमोळ्या व्यक्तीनं साकारली होती.

Movie: आज अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. संपूर्ण देशात  राममय  वातावरण आहे. अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये देखील रामायण दाखवण्यात आलं आहे. आता रामायणावर आधारित असणाऱ्या 107 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या एका चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात, ज्यामध्ये राम आणि सीता मातेची भूमिका एकाच मराठमोळ्या व्यक्तीनं साकारली होती.

107 वर्षापूर्वी रिलीज झाला चित्रपट

'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय मूकपट 1912 साली रिलीज झाला होता.  भारताच्या चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. 'राजा हरिश्चंद्र'  या चित्रपटानंतर  दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये 'मोहिनी भस्मासुर' या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटानंतर त्यांनी 1917 मध्ये  'लंका दहन' नावाच्या चित्रपटाची  केली. या चित्रपटाने 107 वर्षांपूर्वी चांगली कमाई केली होती.

मराठमोळ्या कलाकारानं साकारली राम आणि सीता मातेची भूमिका

 107 वर्षांपूर्वी स्त्रिया चित्रपटात काम करत नव्हत्या.  त्यामुळे दादासाहेब फाळके यांना त्यांच्या चित्रपटातील स्त्री भूमिका साकारण्यासाठी कलाकार शोधताना अनेक अडथळे आले. त्यामुळेच  'लंका दहन' या चित्रपटात  प्रभू श्री रामाची भूमिका  आणि माता सीतेची भूमिका एकाच कलाकारानं साकारली होती. त्या कलाकाराचं नाव अण्णा साळुंके असे होते. 

जाणून घ्या अण्णा साळुंके यांच्याबद्दल

अण्णा साळुंके हे मुंबईतील एका हॉटेलमध्ये कुक किंवा वेटर म्हणून काम करत होते, असं म्हटलं जातं. त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी अण्णांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली. राजा हरिश्चंद्र या चित्रपटात देखील अण्णा साळुंके यांनी काम केलं होतं.या चित्रपटात त्यांनी  राणी तारामतीची भूमिका साकारली होती. 

चित्रपटाची कमाई बैलगाडीतून पोती नेईपर्यंत झाली!

इतिहासकार अमृत गांगर यांनी सांगितले की,  'लंका दहन' या चित्रपटाने इतकी कमाई केली की तिकीट काउंटरवरील नाणी पोत्यांमध्ये गोळा करून ती पोती बैलगाडीमध्ये  भरून निर्मात्याच्या कार्यालयात नेण्यात आली होती. चित्रपट पाहण्यासाठी लोक तिकीट काउंटवर लांबच लांब रांगा लावत होते. त्यावेळी प्रेक्षक हा चित्रपट शूज आणि चप्पल काढून आणि हात जोडून बघत होते.

 'लंका दहन' या चित्रपटाची कथा रामाच्या 14 वर्षांच्या वनवासापासून सुरू होते आणि रावणाच्या वधाने संपते. या चित्रपटात काही खास प्रकारचे स्पेशल इफेक्ट्सही वापरण्यात आले. हा चित्रपट 6 मिनिटांचा होता.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Ram Temple: रितेश म्हणतो, "500 वर्षांची प्रतीक्षा संपली" तर श्रेयस म्हणतो, "आपल्या हयातीत आपल्याला हा क्षण अनुभवता आला"

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget