Sara Kahi Tichyasathi Serial Update : निशीसमोर येणार मेघनाचं सत्य, नात्यांच्या भवितव्याची परीक्षा सुरु होणार?
Sara Kahi Tichyasathi Serial Update : सारं काही तिच्यासाठी ही मालिका सध्या रंजक वळणावर असून आता निशीसमोर मेघनाचं सत्य येणार आहे.

Sara Kahi Tichyasathi Serial Update : काही दिवसांपासून झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) या मालिकेत निशी आणि निरज त्यांच्या प्रेमासाठी परीक्षा देत आहेत. आधी निरजने खोतांच्या घरी राहून त्यांचा विश्वास मिळवला. आता निशी नीरजच्या घरी राहायला गेली आहे. त्यामुळे आता निशी देखील तिच्या परीक्षा देतेय. पण निरजच्या घरात निशीसमोर एक वेगळचं सत्य समोर येणार आहे. रविवार 3 फेब्रुवारी रोजी मालिकेचा महाएपिसोड प्रदर्शित करण्यात येणार आहे.
निशी सध्या निरजच्या घरी राहतेय. पण आता निशीसमोर मेघनाचं सत्य येणार आहे. मेघनानाचे निरजला किडनॅप केलं होतं आणि आरोप दादा खोतांवर केले होते हे सत्य निशीसमोर येणार आहे. तसेच मेघनाही तिच्या या सगळ्या गोष्टी निशीसमोर मान्य करते. त्यामुळे आता निशी या गोष्टींचा कसा सामना करणार आणि ती नीरजला काही सांगणार की नात्याची एक नवी परीक्षा सुरु होणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram
नीरज आणि निशीचं नातं कोणतं नवं वळण घेणार?
नीरजच्या घरात राहत असताना मेघनाकडून निरज आणि निशीच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. उमा घरात नसल्यामुळे जेव्हा निशी तिच्या घरी जाते तेव्हा मेघना घरात खूप काम असल्याचा आव निरजसमोर आणते. त्यामुळे निरजचा देखील थोडा गैरसमज होतो. पण निशीशी बोलून निरज त्याचा गैरसमज दूर करतो.
सध्या ही मालिका बरीच वळणं घेत आहे. निशी आणि नीरजसह श्रीनू आणि ओवीचं नातंही फुलत चाललंय. त्यामुळे आता या दोघांचं नातं घरच्यांसमोर कधी येणार याची देखील उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिलीये. तसेच आता मेघानामुळे निरज आणि निशीच्या नात्यामध्ये कोणती नवी वादळं येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मालिकेच्या महाएपिसोडमध्ये आणखी कोणत्या नव्या गोष्टींचा उलगडा होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार असून प्रेक्षकांना त्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
