Lock Upp Show : 'वयाच्या 10 व्या वर्षी कुटुंबातील व्यक्तीनं केला विनयभंग'; 'लॉकअप' मधील साईशा शिंदेचा गौप्यस्फोट
साईशानं (Saisha Shinde) तिला वयाच्या 10 व्या वर्षी आलेला अनुभव सांगितला.
![Lock Upp Show : 'वयाच्या 10 व्या वर्षी कुटुंबातील व्यक्तीनं केला विनयभंग'; 'लॉकअप' मधील साईशा शिंदेचा गौप्यस्फोट saisha shinde was molested by close family member at the age of 10 share Revealed in Lock Upp Show Lock Upp Show : 'वयाच्या 10 व्या वर्षी कुटुंबातील व्यक्तीनं केला विनयभंग'; 'लॉकअप' मधील साईशा शिंदेचा गौप्यस्फोट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/254bc9ad3ed009f71b3714fa967388d3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lock Upp Show : छोट्या पडद्यावरील लॉकअप (Lock Upp Show) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील स्पर्धक एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचे किस्से प्रेक्षकांना सांगत आहेत. लॉकअप शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही करते. या कार्यक्रमाच्या विकेंडच्या एपिसोडमध्ये साईशा शिंदेनं (Saisha Shinde) तिच्या वैयक्तिक आयुष्यामधील काही घटना सांगितल्या. यावेळी साईशानं तिला वयाच्या 10 व्या वर्षी आलेला अनुभव सांगितला.
सायशानं सांगितलं की, वयाच्या दहाव्या वर्षी तिच्या कुटुंबातील एका व्यक्तीनं तिचा विनयभंग केला. पण त्यावेळी तिला ही गोष्ट लक्षात आली नव्हती की तिचा विनयभंग केला जात आहे. या आधी देखील साईशानं लॉकअप या शोमध्ये तिला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं. तिने सांगितले होते की तिच्या बॉयफ्रेंडनं देखील तिला त्रास दिला होता.
View this post on Instagram
‘लॉकअप’ शोमध्ये सर्व स्पर्धकांवर 24x7 लक्ष ठेवले जाते. लॉकअप या कार्यक्रमामध्ये तहसीन पूनावालाचं इविक्शन झालं आहे. यावेळी तहसीन एका व्यक्तीला नॉमिनेट होण्यापासून वाचवू शकत होता. तेव्हा त्यानं साईशाची निवड केली होती. Alt Balaji आणि MX Player या अॅप्सवर तुम्ही लॉकअप हा शो पाहू शकता.
हेही वाचा :
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या वादावर कपिल शर्मानं दिली रिअॅक्शन; दिग्दर्शकानं केला होता आरोप
- Sonam Kapoor : सायबर फ्रॉडचे शिकार, सोनम कपूरच्या सासऱ्यांना तब्बल 27 कोटींचा गंडा!
- Bhuban Badyakar : ‘खूप चुकलो! आता पुन्हा शेंगदाणे विकेन’, ‘कच्चा बदाम’ फेम गायक भुवन बड्याकरला झाली उपरती!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)