Rupali Bhosle : 'आई कुठे काय करते' मालिकेतील रूपाली भोसलेला झाली दुखापत; पोस्ट शेअर करत दिली माहिती
Rupali Bhosle: एका मुलाखतीमध्ये रूपालीनं या दुखापतीबाबत सांगितलं.

Rupali Bhosle : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रूपाली भोसलेच्या (Rupali Bhosle) अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. रूपालीला आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत संजना ही भूमिका रूपाली साकारते. नुकताच रूपालीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये रूपालीच्या पायाला दुखापत झालेली दिसत आहे. एका मुलाखतीमध्ये रूपालीनं या दुखापतीबाबत सांगितलं.
एका इंग्रजी वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत रूपालीनं सांगितलं,'मी आई कुठे काय करते मालिकेचा एका सीन शूट करत होते. या सीनमध्ये अभिनेते मिलिंद गवळी देखील माझ्यासोबत होते. सीन असा होता की, अनिरूद्ध हा संजनाला घटस्फोट देण्याचा विचार करतो. हे लक्षात येताच संजना ओरडते आणि खुर्चीवर बसते. मला वाटलं की खुर्ची ऐवजी जमिनीवर बसायचे आहे. त्यामुळे मी ओरडले आणि खाली बसले. खाली बसताना माझ्या पायाचं बोट फोल्ड झालं आणि अंगठ्याचं नख तुटल्या. नख तुटल्यानं रक्त येत होतं. शूटिंग सुरू असलेल्या सेटच्या आजूबाजूला डॉक्टर देखील नव्हते. मला खूप दुखत होतं.'

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते मिलिंद गवळी हे साकारतात. तर अरुंधती ही भूमिका अभिनेत्री मधुरणी प्रभुलकर या साकारतात. या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
हे देखील वाचा-
- Thar Trailer : अनिल कपूर आणि हर्षवर्धनच्या 'Thar' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 'या' तारखेला चित्रपट नेटफ्लिक्सवर झळकणार
- India’s Got Talent 9 Winner: लाखो रूपये, लग्झरी कार अन् ट्रॉफी ; इंडियाज गॉट टॅलेंटची विजेती जोडी दिव्यांश आणि मनुराजवर बक्षीसांचा पाऊस
- The Archies : शाहरूखची लेक सुहाना अन् जान्हवीची बहीण खुशी कपूरसोबत झळकणार ‘बिग बीं’चा नातू अगस्त्य! चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
महत्त्वाच्या बातम्या





















