Thar Trailer : अनिल कपूर आणि हर्षवर्धनच्या 'Thar' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 'या' तारखेला चित्रपट नेटफ्लिक्सवर झळकणार
Thar Trailer : अनिल कपूर आणि हर्षवर्धन स्टारर 'थार' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट 6 मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Thar Trailer : अनिल कपूर (Anil Kapoor) आणि हर्षवर्धन स्टारर (Harshvardhan Kapoor)'थार' (Thar) या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट 6 मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक डार्क थ्रिलर आहे. या चित्रपटात पिता-पुत्राची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट सस्पेन्स, थ्रिलरने परिपूर्ण असणार आहे.
ट्रेलरची सुरुवात एका खुनाने होते. ज्याची चौकशी अनिल कपूर आणि सतीश कौशिक करत आहेत. त्याचबरोबर हर्षवर्धन कपूरची एन्ट्री आहे जो एका बिझनेसमनच्या भूमिकेत दिसणार आहे. हर्षची भूमिका प्राचीन वस्तूंच्या शोधात आहे. हा चित्रपट सिद्धार्थची गोष्ट सांगतो. जो नुकत्याच झालेल्या हिंसक हत्याकांडानंतर खूप व्यथित झाला आहे. जेव्हा स्थानिक पोलिस सुरेखा सिंग या खुनांचा तपास करतात तेव्हा गोष्टींना एक मनोरंजक वळण मिळते.
ब्लॅक कॉमेडी थ्रिलर, AK Vs AK नंतर अनिल आणि हर्ष ही पिता-पुत्र जोडी पडद्यावर एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. स्ट्रीमिंग जायंट नेटफ्लिक्सवर या चित्रपटाचा डायरेक्ट-टू-डिजिटल प्रीमियर असेल.
त्याचवेळी अनिल कपूर या चित्रपटाबद्दल सांगतात की, त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर त्यांच्यासाठी 'थार' चित्रपटाची ऑफर घेऊन आला होता. या प्रकल्पाबद्दल तो खूप उत्सुक होता. चित्रपटाबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाले की, हर्षवर्धनचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आणि त्याची चित्रपटांची निवडही खूप वेगळी आहे.
चित्रपटाविषयी हर्षवर्धन म्हणाला, "कथा संथ आहे, आणि प्रत्येक घटकाकडे वेगळ्या दृष्टीकोणातून पाहणारा आहे. निर्माता म्हणून हर्षवर्धनचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि मी त्याच्यामध्ये चित्रपटाबद्दलची उत्कटता पाहिली आहे. 'थार' हा एक उत्तम अनुभव आहे. "
राज सिंह चौधरी दिग्दर्शित 'थार'मध्ये हर्षवर्धन कपूर, फातिमा सना शेख, सतीश कौशिक आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'थार' हा सिनेमा 6 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- टांझानियाच्या किली पॉलला KGF 2 चं वेड, लिप-सिंक करत बनवला व्हिडीओ, तुम्हीही नक्की पाहा
- KGF 2 : यशच्या 'केजीएफ 2'चा बोलबाला; सहा विक्रम केले नावावर
- KGF 2 : पडद्यावर सुपर फ्लॉप ठरला होता यशचा ‘रॉकी’, आता ‘रॉकी भाई’ बनून करतोय प्रेक्षकांच्या मनावर राज्य!
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















