Bigg Boss Marathi : आज बिग बॉस मराठीच्या घरात रितेश भाऊंची एन्ट्री, भाऊच्या धक्क्यावर होणार कुटुंबियांची भेट
Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : आज रितेश भाऊ स्वतः बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहेत. घरच्यांशी बोलून सगळ्यांचे आनंदाश्रू वाहताना पाहायला मिळतील.
Bigg Boss Marathi : आज बिग बॉस मराठीच्या घरात रितेश भाऊंची एन्ट्री होणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये 50 व्या दिवशी घरात होस्ट रितेश देशमुख यांची एन्ट्री होणार आहे. आज रितेश भाऊ स्वतः बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहेत. रितेश भाऊ घरात आल्यावर घरातील सदस्यांना सरप्राईज मिळणार आहे. रितेश भाऊ सदस्यांच्या कुटुंबियांचे खास मेसेज सदस्यांपर्यंत पोहोचणार आहेत.
आज बिग बॉस मराठीच्या घरात रितेश भाऊंची एन्ट्री
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरातील सदस्य 50 दिवसांपासून कुटुंबियांपासून दूर बिग बॉसच्या घरात आहेत. या काळात त्यांचा कुटुंबियांशी संवाद बंद असल्यामुळे बिग बॉस आज सदस्यांच्या कुटुंबियांसोबत भेट घडवणार आहेत. बिग बॉसने आजच्या भाऊच्या धक्क्याच्या नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेश भाऊ बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेताना दिसत आहेत. त्यानंतर रितेश भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसच्या घरातील सदस्यांना कुटुंबियांचे खास मेसेज पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
भाऊच्या धक्क्यावर होणार कुटुंबियांची भेट
बिग बॉसच्या घरात कुटुंबापासून दूर असलेल्या सदस्यांना आज कुटुंबियांची एक झलक पाहता येणार आहे. बिग बॉस मराठी भाऊच्या धक्क्याच्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतात, आज मी या सगळ्या सदस्यांना खूप मोठं सरप्राईज देणार आहे. तुमच्यासाठी मी घरच इकडे आणलंय. अभिजित सावंतच्या मुली बोललात, हा डॅडा कसा आहेस तू? संग्राम चौगुलेची मुलगी बोलते, असं पहिल्यांदा झालं की माझ्या वाढदिवसाला तू माझ्यासोबत नाहीस. जान्हवी किल्लेकरचा मुलगा म्हणतो, आय लव्ह यू आई. यावर जान्हवी पुढे म्हणते आय लव्ह यू ईशान. कुटुंबियांचे व्हिडीओ मेसेज पाहून घरातील सदस्य इमोशनल झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
घरच्यांशी बोलून सगळ्यांचे आनंदाश्रू वाहणार
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :