Rang Majha Vegla : दीपा आणि आयेशाच्या येण्याने इनामदारांच्या घरात सुरु होणार नवा वाद, ‘रंग माझा वेगळा’च्या कथेत ट्विस्ट!
Rang Majha Vegla : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.
![Rang Majha Vegla : दीपा आणि आयेशाच्या येण्याने इनामदारांच्या घरात सुरु होणार नवा वाद, ‘रंग माझा वेगळा’च्या कथेत ट्विस्ट! Rang Majha Vegla Marathi Serial latest update Deepa and Aayesha enters in Kartiks house Rang Majha Vegla : दीपा आणि आयेशाच्या येण्याने इनामदारांच्या घरात सुरु होणार नवा वाद, ‘रंग माझा वेगळा’च्या कथेत ट्विस्ट!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/fcdb3a9ab03fea776afba6795187b8ae1664182179286373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rang Majha Vegla : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत रोजच काहीना काही नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेच्या कथेत येणाऱ्या सततच्या वळणांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. आता नवरात्रीच्या माहोलात या मालिकेत पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट येणार आहे. इनामदारांच्या घरात एकाच वेळी दीपा आणि आयेशा यांचा प्रवेश होणार आहे. यानंतर आता पुन्हा एकदा नव्या वादाची सुरुवात होणार आहे.
सध्या मालिकेत दीपा आणि तिच्या दोन्ही मुली अर्थात दीपिका-कार्तिकी या आता एकत्र राहू लागल्या आहेत. कोर्टाने दीपाच्या बाजूने निर्णय देत दीपिकाची कस्टडी एका महिना दीपाकडे, तर एक महिना कार्तिककडे ठेवण्याचा निर्णय दिला होता. यानंतर पहिल्या महिन्यात दीपिका ही आपल्या आईसोबत म्हणजेच दीपा आणि बहीण कार्तिकीसोबत राहिली. मात्र, आता तिचा दीपाच्या घरातील एक महिन्याचा मुक्काम संपला असून, दीपिकाला आता कार्तिकच्या घरी म्हणजेच इनामदारांच्या घरात परत जावे लागणार आहे.
आई-बाबांना एकत्र आणण्यासाठी दीपिका आणि कार्तिकीचा नवा प्लॅन
अनेक प्रयत्न करूनही दीपा आणि कार्तिक एकत्र येत नाहीयेत. त्यांच्या दोन्ही मुली आपल्या आई बाबांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. याही वेळी त्यांनी एक नवी योजना आखली आहे. त्यांच्या या योजनेनुसार जेव्हा दीपिका इनामदारांच्या घरात परत जाईल तेव्हा, तिने एकट्याने जायचे नाही. त्यामुळे कार्तिक दीपिकाला घ्यायला घरी आल्यावर ती मी एकटी येणार नाही, असे ती म्हणते. माझ्यासोबत आई आणि कार्तिकी पण येणार, तरच मी त्या घरात येईन. कार्तिक तिची अट मान्य करतो आणि तिघींना घरी घेऊन येतो.
आयेशाची एन्ट्री
दीपा घरात येणार म्हटल्यावर आयेशा पुन्हा एकदा कार्तिकवर चिडली आहे. यानंतर तिने देखील आता दीपाला मात देण्यासाठी एक नवीन योजना केली आहे. दीपा इनामदारांच्या घरात राहायला आल्यावर आयेशा देखील घरात राहायला येणार आहे. यावरून पुन्हा एकदा इनामदारांच्या घरात वादाला तोंड फुटणार आहे. दीपा या घरात राहून शकते तर, आयेशा का नाही, असा सवाल कार्तिक करणार आहे. तर, मी कार्तिकची बायको म्हणून या घरात आलेले नाही तर, दीपिका आणि कार्तिकीची आई म्हणून घरात राहणार असल्याचे दीपा म्हणणार आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)