एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Entertainment News Live Updates 26 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 26 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

आलिया भट्टची गगनभरारी! नेटफ्लिक्सच्या 'Heart Of Stone' सीरिजमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंच आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेला चित्रपट ब्रम्हास्त्रने (Brahmastra) देखील बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. पण, आता आलियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीवर आपलं स्थान निर्माण केल्यानंतर आता आलिया हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोन (Heart Of Stone) या वेबसीरिजच्या माध्यमातून आलिया हॉलिवूडमध्ये दिसणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे.  

बॉलिवूड ‘किंग’ शाहरुख खानचा जलवा, ‘जवान’चे शूटिंग पूर्ण होण्याआधीच चित्रपटाची बंपर कमाई!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'जवान' (Jawan) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. 2023मध्ये शाहरुख खानचे एकूण 3 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी एका चित्रपटामध्ये तो अॅक्शन अवतारात दिसणार आहे. साऊथचे चित्रपट निर्मात अॅटली याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरुख एका वेगळ्या अंदाजात दिसला आहे. शाहरुख खान बऱ्याच दिवसांनी पडद्यावर परतत असून प्रत्येकजण त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहे. आता हा चित्रपट त्याच्या जबरदस्त कमाईमुळे चर्चेत आला आहे.

ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे निधन, 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर (Louise Fletcher) यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. लुईस फ्लेचर यांनी त्यांच्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. 1975 मध्ये मिलोस फोरमन दिग्दर्शित ‘वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट’ या चित्रपटात साकारलेल्या नर्स रॅचेडच्या भूमिकेसाठी लुईस फ्लेचर प्रसिद्ध होत्या. या चित्रपटात अभिनेते जॅक निकोल्सन यांनीही काम केले होते.

फाल्गुनी पाठकच्या गाण्याचा रिमेक केल्यानंतर ट्रोल झालेल्या नेहानं शेअर केली पोस्ट

गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) ही तिच्या गाण्यांमुळे चर्चेत असते. नुकत्याच रिलीज झालेल्या 'ओ सजना' या गाण्यासाठी गायिका नेहा कक्करला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. हे गाणं फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या 'मैने पायल है छनकाई...' (Maine Payal Hai Chhankai) या गाण्याचा रिमेक आहे. फाल्गुनी पाठक यांचे 'मैने पायल है छनकाई...'  हे गाणे 1999 मध्ये रिलीज झाले. या गाण्याचा रिमेक केल्यानं नेहाला नेटकरी ट्रोल करत आहेत. आता नुकतीच नेहानं एक पोस्ट शेअर करुन ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

‘छेल्लो शो’ची ऑस्करवारी वादात; चित्रपटाची निवड अयोग्य म्हणत FWICEचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र!

पान नलिन (Pan Nalin) यांचा ‘छेल्लो शो’ (Chhello Show) हा चित्रपट आता वादात सापडला आहे. 2023च्या ऑस्कर नामांकनासाठी भारताकडून या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. मात्र, आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) या निवडीला अयोग्य म्हणत, चित्रपटाला विरोध केला आहे. यासंदर्भात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजकडून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना एक पत्र देखील लिहिण्यात आलं आहे. FWICEने म्हटले की, हा चित्रपट भारतीय चित्रपट नाही. चित्रपटाच्या निवडीची पद्धत योग्य नसून, परीक्षकांनी त्यावर विचार केला पाहिजे.

23:08 PM (IST)  •  26 Sep 2022

Mahesh Manjrekar : 'त्या' गोष्टीचा त्रास माझ्या मुलांना व्हायचा : महेश मांजरेकर

महेश मांजरेकर म्हणाले आहेत,"ट्रोलर्सकडे मी लक्ष देत नाही. मी माझ्या मुलांनाही त्या कमेंट्स न वाचण्याचा सल्ला देतो. प्रत्येकाचे चाहते असतात. त्यामुळे मी जर एका स्पर्धकाला झापलं तर त्याच्या चाहत्यांना वाटणारच की मी भेदभाव करतो. पण या गोष्टीला पर्याय नाही. मी कधीच भेदभाव करत नाही. कारण माझा कोणीच आवडता स्पर्धक असा नसतो. कोण विजेता होणार हे प्रेक्षकच ठरवत असतो. त्यामुळे तो जसा चाहत्यांना आवडतो तसाच मला आवडतो". 

21:45 PM (IST)  •  26 Sep 2022

Varsha Usgaonkar : "दिसण्यापेक्षा अभिनयाकडे लक्ष द्या" : वर्षा उसगांवकर

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) सध्या 'हवाहवाई' (Hawahawai) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी 'दिसण्यापेक्षा अभिनयाकडे लक्ष द्या', असा सल्ला काही अभिनेत्रींना दिला आहे. 

20:21 PM (IST)  •  26 Sep 2022

Netflix 2022 : दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा धमाका

Netflix 2022 Upcoming Web series And Movies : दिवसेंदिवस ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढताना दिसत आहे. सिनेप्रेमी सध्या सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहायला पसंती दर्शवत आहेत. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून येत्या दिवाळीत अनेक सिनेमे (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. 

20:20 PM (IST)  •  26 Sep 2022

Vikram Vedha Bande Song : 'विक्रम वेधा' सिनेमातील 'बंदे' गाणं आऊट

Vikram Vedha New Song : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) आगामी 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील 'बंदे' (Bande) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

17:18 PM (IST)  •  26 Sep 2022

Shivpratap Garudjhep : 'शिवप्रताप गरुडझेप' लाल किल्ल्यात चित्रित होणारा पहिलाच सिनेमा

Amol Kolhe On Shivpratap Garudjhep : डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' हा सिनेमा करताना उभ्या देशाचं लक्ष सिनेमाकडे वेधलं गेलं पाहिजे या जबाबदारीची जाणीव होती, असं 'शिवप्रताप गरुडझेप'च्या आठवणींना उजाळा देताना एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat on Eknath shinde :  गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाटGulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंयRaosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
Embed widget