एक्स्प्लोर

'तो' परत आलाय.... 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत नवा ट्विस्ट

सतत वहिनीच्या ताटाखालचं मांजर बनलेला राणा दा या वेशात वहिनीला धडा शिकवणार का? अंजली आणि राणाची म्हणजेच आता राजा राजगौंडाची प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार का?

मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत पप्या पाटीलने राणा दाचा काटा काढला आणि या मालिकेचा तमाम प्रेक्षकवर्ग हळहळला. राणा दा कुठे गेला? तो परत येणार का? किंवा त्याच्या जागी कोणता नवा चेहरा पाहायला मिळणार? आता अंजली आणि लाडूचं काय होणार? या अन अशा अनेक प्रश्नांनी प्रेक्षकांचं डोकं बधिर करुन सोडलं. पण थांबा तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही आलो आहोत. तर राणा दा परत येतोय. होय खरंच. कसा? तर ह्यो असा. झी मराठीवरच्या नव्या प्रोमोमध्ये तोडफोड करणारा रावडी राठोड आपला राणा दाच आहे. काय गोंधळलात ना? आता हा प्रोमो बघून तुम्हाला वाटेल हे काय नवीन. पण विश्वास ठेवा, हा आपला राणा दाच आहे. आणि तो परत ही येतोय. शेवटी राणा दा आहे तो. त्याचा कमबॅक त्याच्याइतकाच जबरदस्त असायला हवा, नाही का? महत्त्वाची गोष्ट म्हणजे भोळा भाबडा असणारा आपला राणा दा आता मात्र अट्टल पाकिटमार आणि टपोरी अंदाजात दिसणार आहे, ते पण एकदम आण्णा स्टाईल. जे आजवर साऊथच्या सिनेमात दिसत होतं ते आता मराठी मालिकेत दिसणार आहे बरं का? 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतला राणादा खरंच बदलणार! मालिकेच्या सुरुवातीला भोळा भाबडा दिसणारा राणा दा आता मात्र अस्सल साऊथ इंडियन लूकमध्ये फूल ऑन राडा करणार हे त्याच्या या हटके लूकवरुनच लक्षात येतंय. या बदललेल्या लूकसोबत राणा दाचं नावही बदललं आहे बरं का?. काय आहे राणा दाचं नवं नाव? तर त्याचं नाव आहे राजा राजगौंडा. हा राजा राजगौंडा येत्या 28 जून रोजीत मालिकेत धडकणार आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून राणादाची एक्झिट? आता हा राजा राजगौंडा  म्हणजे आपला गायब झालेला राणा दा आहे का? जर हो तर मालिकांच्या परंपरेला अनुसरुन यातही राणा दा स्मृतीभ्रंश झालेला दाखवणार का? सतत वहिनीच्या ताटाखालचं मांजर बनलेला राणा दा या वेशात वहिनीला धडा शिकवणार का? अंजली आणि राणाची म्हणजेच आता राजा राजगौंडाची प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिका जशजशी पुढे सरकेल तशी मिळतीलच.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget