Purushottam Maharaj Patil : घरातले टॉप तीन स्पर्धक कोण? पहिल्याच आठवड्यात एलिमिनेट झालेल्या पुरुषोत्तम दादांनी केली स्पर्धकांची पोलखोल
Purushottam Maharaj Patil : बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात एलिमिनेट झालेल्या पुरुषोत्तम दादा यांनी घरातील स्पर्धकांविषयीच्या अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
Purushottam Maharaj Patil : बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचं (Bigg Boss Marathi Season 5) पहिलं एलिमिनेशन नुकतच पार पडलं. त्यामुळे अवघ्यात सातच दिवसांत राम कृष्ण हरि म्हणत पुरुषोत्तम दादा (Purushottam Maharaj Patil) यांना घराच्या बाहेर पडावं लागलं. पण घराच्या बाहेर पडून त्यांनी घरातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यामुळे घरात सुरु असलेल्या राड्याचा आता खऱ्याअर्थाने अर्थ स्पष्ट झालाय.
पुरुषोत्तम दादा यांनी घरातल्या सदस्यांविषयी अनेक गोष्टी घरातून बाहेर पडल्यानंतर सांगितल्या आहेत. त्यामुळे घरातील टॉप 3 स्पर्धक, घरात सर्वात भांडखोर कोण, फायनलमध्ये कोण जाणार अशा अनेक प्रश्नांची उत्तर पुरुषोत्तम दादा यांनी दिली आहे. घरात कल्ला करण्या सगळ्यांची आता पुरुषोत्तम दादांनी पोलखोल केली आहे.
पुरुषोत्तम दादा यांनी सांगितले घरातले टॉप 3 स्पर्धक कोण?
घरातून बाहेर आल्यावर पुरुषोत्तम दादा यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना घरातील टॉप 3 स्पर्धक कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटलं की, अभिजीत सावंत,धनंजय पोवार आणि अंकिता हे स्पर्धक मला टॉप 3 मध्ये दिसतात. तसेच घरातील भांडखोर स्पर्धक कोण? या प्रश्नाचं उत्तर देताना पुरुषोत्तम दादा यांनी म्हटलं की, निक्की ही घरातील सर्वात भांडखोर स्पर्धक आहे. याचं कारण देत त्यांनी म्हटलं की, ती अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद निर्माण करत असते.
स्पर्धकाचं वर्णन एका शब्दांत
पुरुषोत्तम दादा यांनी घरातल्या स्पर्धकांचं एका शब्दांत वर्णन केलं आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक स्पर्धकांची पोलखोल केल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे घरातल्या स्पर्धकांचा स्वभाव नेमका कसा आहे, हे आता घरातीलच एका स्पर्धकाने सांगितलंय.
वैभव चव्हाण - स्वत:च्या मनाने विचार न करणारा
अरबाज पटेल - निक्कीचं ऐकणारा
घन:श्याम - स्वत:मध्ये राहणारा
इरीना - मराठी संस्कृतीला आपलंसं करणारी
निक्की - अहंकारी
अभिजीत सावंत - प्रेमळ
पंढरीनाथ कांबळे - समजूतदार
आर्या जाधव - बालिश
योगिता चव्हाण - समजूतदार
जान्हवी किल्लेकर - निक्कीचं ऐकते
अंकिता - खूप प्रेमळ
निखिल दामले - अबोल
धनंजय पोवार - हसवणारा, रडवणारा
सूरज चव्हाण - भारी माणूस
View this post on Instagram