एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Chhota Pudhari Paddy Kamble : पॅडी कांबळेने छोटा पुढारीची लाज काढली, संतापलेल्या घन:श्यामने म्हटले, तुम्हाला...

Bigg Boss Marathi Season 5 : घरातील दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही वादावादीने होणार असल्याचे चित्र आहे. बिग बॉसच्या घरात अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेने छोटा पुढारी घन:श्याम दरवडे याची लाजच काढली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 :  'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनचा (Bigg Boss Marathi New Season) दुसरा आठवडा सुरू झाला आहे.  'बिग बॉस'च्या घरात पहिल्या आठवड्यात शांत असणारे सदस्य आता आपला खेळ उंचावण्यासाठी आणि घरातील चर्चेत पुरेपुर प्रयत्न करणार आहेत. घरातील दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही वादावादीने होणार असल्याचे चित्र आहे. बिग बॉसच्या घरात अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेने (Paddy Kamble) छोटा पुढारी घन:श्याम दरोडे (Ghanshyam Darode) याची लाजच काढली आहे. 

बिग बॉस मराठीतून पहिल्या आठवड्यात किर्तनकार पुरुषोत्तम पाटील घराबाहेर पडले आहेत. त्यानंतर आता इतर 15 सदस्य घरात आपले वजन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. दुसऱ्या आठवड्यात घरात काही घडामोडी होणार आहेत.  ‘बिग बॉस’मध्ये पॅडी व घन:श्याम यांच्यातही भांडण होत असल्याचे पाहायला मिळणार आहे.

काय झालं नेमकं?

नवीन प्रोमोनुसार, पॅडी घन:श्यामला बोलतात की, “तुला लाज नाही वाटत?, ‘बिग बॉस’ आपल्याविरुद्ध बोलत आहेत. यावर घन:श्याम पॅडीला असं म्हणतो की, “मला कशाची लाज वाटणार. ‘बिग बॉस’ बोलले त्यावरुन हे सिद्ध होते की, मी झोपलो नव्हतो”. यानंतर तो रागात “माझी लाज काढू नका” असेही घन:श्याम म्हणतो. त्यावर पॅडी पुन्हा एकदा असं म्हणतात की, “बिग बॉस आपल्याला सुनावत आहेत आणि तू त्यांच्यासमोर (आव्हान दिल्यासारखे) हातावर थाप मारत आहेस”. यावर घन:श्याम पॅडीला “ठीक आहे सॉरी. पण तुम्ही लाज काढू नका” असे म्हणतो.

घन:श्यामची पॅडीवर चिडचिड...

प्रोमोवरून हा प्रकार दुपारच्या वेळी घरात झोपल्यामुळे झाले असल्याचा अंदाज आहे.पॅडी घन:श्यामला बोलताना सांगतात की “तुला काहीतरी वाटलं पाहिजे” असं म्हण ते घन:श्यामला “येडया येडया” असं बोलतात.

पॅडीने चिडवल्यानंतर ‘बिग बॉस’ घन:श्यामला असं म्हणतात की, “आपण जरी झोपला नसलात तरी कोण झोपलं आहे. याच्याकडे आपले डोळे उघडे पाहिजे” त्यानंतर घन:श्याम पॅडीला पुन्हा “याआधी एखाद्याची लाज काढण्याआधी ध्यानात ठेवा” असे छोटा पुढारी म्हणतो. 

निक्की-अरबाजमध्येही वादाचे फटाके 

निक्की अरबाजला समजावत असताना अरबाजचा आवाज वाढतो, त्यावेळी निक्की त्याच्यावर चांगलीच भडकते. त्यामुळे या दोघांमध्ये वादाची पहिली ठिणगी पडते. दरम्यान घन:श्याम, जान्हवी आणि वैभव या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच आता ज्यांची मैत्री जुळली होती, त्यांच्यातही आता वादाला तोंड फुटलं आहे. 

इतर महत्त्वाची बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Embed widget