Punha Kartvya Ahe : 'लहान मुलांवर झालेले अन्याय कसे दाखवावेसे वाटतात, बॅन करायला हवी मालिका'; 'पुन्हा कर्तव्य आहे'च्या ट्रॅकवर प्रेक्षक संतापले
Punha Kartvya Ahe : पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या कथानकावर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं पाहायला मिळत आहे.
Punha Kartvya Ahe : झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartvya Ahe) या मालिकेच्या ट्रॅकवर सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. या मालिकेत होणाऱ्या गोष्टी, मालिकेचं कथानक यावर प्रेक्षकांची तीव्र नाराजी असल्याचंही चित्र आहे. त्यातच बनीला आता होस्टेलवर राहायला जाणार असल्यामुळे अनेकांनी त्यावर पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आकाशची आई आणि आत्या बनीच्या मनात खूप काही भरवतात. त्यामुळे त्याला आपण आपल्या आईची अडचण होत आहोत, असं वाटत राहत. त्यानंतर तो आपल्या आईला त्रास होऊ नये म्हणून होस्टलवर जायचा निर्णय घेतो. त्याचा हा निर्णय ऐकून आकाश आणि वसुंधराला धक्का बसतो. पण तरीही बनीच्या हट्टामुळे ते त्याला होस्टेलला सोडायला तयार होतात.
मायलेकाची होणार ताटातुट
बनीला होस्टेलवर सोडायला आकाश आणि वसुंधरा दोघेही सोडायला जाणार असतात. पण आकाशच्या आईच्या खोट्या आजारपणामुळे आकाशला येता येत नाही. त्यामुळे वसुंधराच बनीला सोडायला जाते. त्यावेळी वसुंधरा खूपच भावुक झाल्याचं पाहायला मिळतं. पण बनी तिला समजावतो आणि तो होस्टेलवर जातो.
मालिकेच्या ट्रॅकवर प्रेक्षक संतापले
मालिकेकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोवर मात्र प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, मुलांवर झालेले अन्याय कसे काय दाखवावेसे वाटतात, बॅन करा ही मालिका. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, किती भंगार आहे ही मालिका आम्ही कुणीच बघत नाही. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, मुलांवर ह्याचा परिणाम होतोय, आम्ही मालिका बघणं बंद केलंय. त्यामुळे या मालिकेवर प्रेक्षकांची तीव्र नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय.
View this post on Instagram