एक्स्प्लोर

Premachi Goshta : आदित्यचा आगाऊपणा! मुक्ताला पार्टीतून हकललं, सावनी आणि हर्षला झाला आनंद, आता सागर काय करणार?

Premachi Goshta : प्रेमाची गोष्ट या मालिकेतील आजच्या भागात आदित्य मुक्ताला त्याच्या पार्टीतून हाकलून देणार आहे.

Premachi Goshta : स्टार प्रवाह (Star Pravah) या वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत सध्या आदित्यच्या बर्थडे पार्टीची धूम पाहायला मिळतेय. आदित्यने त्याच्या या पार्टीसाठी सागरला देखील बोलावलं आहे. आनंदात सागर सई आणि मुक्तासह आदित्यच्या बर्थडे पार्टीला पोहचतो. पार्टीत आल्या आल्या सावनी मुक्ताचा अपमान करते. त्यावेळी मुक्ता सावनीला चोख उत्तर देते. आदित्यच्या मनात सागर-मुक्ताबद्दल तिरस्कार आहे. सागर आणि मुक्ता आदित्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जातात. पण आदित्य त्यावर उद्धटपणे आणि आगाऊपणे प्रतिसाद देतो. 

दरम्यान सावनी ही सईला आपल्या बाजूला वळवण्यासाठी आणि तिच्याकडून कोळी कुटुंबात काय सुरू आहे, याची माहिती काढण्यासाठी गोडगोड बोलते. त्यावेळी ती सईच्या मुक्ताआईवर खोटं असल्याचा आरोप करते. त्यावर सई ही तिच्या सागर पप्पाची आणि मुक्ताआईची बाजू घेत सावनीला तुम्हीच खोटारडे असल्याचं म्हणते. सईकडून मुक्ताचे होत असलेले कौतुक ऐकून सावनीचा अंहकार दुखावतो. तुझ्या आठवणीत मला रडू येतं असं सावनी सईला सांगते, तेव्हा तु खोटं बोलत असल्याचं सई सावनीला म्हणते. 

आदित्यचा आगाऊपणा

प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आदित्य मुक्ताचा अपमान करत जोपर्यंत ती पार्टीमधून जात नाही, तोपर्यंत मी केक कापणार नाही, असं म्हणतो. आदित्य सागरने दिलेले गिफ्ट्स देखील फेकून देतो. त्यावर मुक्ता आदित्यला त्याची ही वागणूक योग्य नसल्याचं सांगते. त्यावर आदित्य चिडतो आणि मुक्ताला पार्टीतून जायला सांगतो. आदित्यच्या या वागणुकीचा हर्ष आणि सावनीला भलताच आनंद होतो. तसेच सावनी मुक्ताला जाता जाता पुन्हा एकदा तिच्या मातृत्वावरुन काही गोष्टी ऐकवते. 

मुक्ताचे सावनीला चोख उत्तर

मुक्ता जेव्हा पार्टीतून जायला निघते, तेव्हा सावनी तिला अडवते. सावनी तिला म्हणते, जे काही माझं आहे, ते माझ्याकडे परत येणारच. यावर मुक्ता सावनीला चोख उत्तर देते. यावर ती म्हणते की, ओरबाडणं आणि प्रेमानं गोष्टी मिळवणं यात तितकाच फरक आहे, जितका आज तुमचा आदित्यची होण्यात आणि माझा सईची असण्यात आहे. मुक्ताच्या या उत्तराने सावनीचा तिळपापड होतो. पण आदित्यच्या अशा वागण्यावर सागर आता काय करणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

ही बातमी वाचा : 

Prathamesh Parab Wedding :  'तुझी आठवण कायम राहिल..', लग्नाच्या काही तास आधी दगडूच्या पराजूची घरासाठी भावनिक पोस्ट,तर पोस्टवरील प्रथमेशच्या कमेंटची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget