एक्स्प्लोर

Prathamesh Parab Wedding :  'तुझी आठवण कायम राहिल..', लग्नाच्या काही तास आधी दगडूच्या पराजूची घरासाठी भावनिक पोस्ट,तर पोस्टवरील प्रथमेशच्या कमेंटची चर्चा

Prathamesh Parab Wedding :  अभिनेता प्रथमेश परब हा आज लग्नबंधनात अडकणार आहे. त्याआधी त्याची होणारी पत्नी क्षितीजा हीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Prathamesh Parab Wedding :  काही दिवसांपासून अभिनेता आणि प्रेक्षकांचा लाडका दगडू म्हणजेच प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा आज म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. त्याआधी त्याची होणारी पत्नी आणि गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar) हीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. क्षितीजाने तिच्या घरासाठी ही पोस्ट लिहिलीये. त्यावर प्रथमेशने केलेल्या कमेंटने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.  प्रथमेशच्या हळदीचे, क्षितीजाच्या मेहंदीचे फोटो सध्या बरचे चर्चेत आहेत. तसेच त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी देखील बऱ्याच कमेंट्स करत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या. 

प्रथमेशने 14 फेब्रुवारी रोजी क्षितीजासोबत साखरपुडा केला होता. तसेच त्यानंतर त्यांच्या प्रीवेंडीच्या फोटोंवर देखील चाहत्यांनी खूप प्रेम केलं. नुकतच क्षितीजाने भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टवर प्रथमेशने केलेल्या कमेंटने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. क्षितीजाने तिच्या माहेरसाठी पोस्ट करत तुझी आठवण कायम येत राहील अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यावर प्रथमेशने कमेंट करत तुला एवढं प्रेम देऊ की तुला दोन्ही घरं आपली वाटली पाहिजेत, अशी कमेंट केली आहे. 

क्षितीजाने पोस्टमध्ये काय म्हटलं?

क्षितीजाने तिच्या आताच्या घरासाठी म्हणजे तिच्या माहेरसाठी ही पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, आज सजलेल्या मंडपाने किती छान दिसतंय माझं घर. आजपर्यंत , तुझी "माझं घर", अशी असलेली ओळख आता "माझं माहेर", अशी होणार आणि आता अवघ्या काही तासांतच मी तुझा निरोप घेणार. तुझ्या प्रत्येक कोपऱ्याशी असलेल्या आठवणींना आज जणू खास एक चेहराच मिळालाय. काही मनसोक्त हसतायत, काही अलवार रडतायत, काहींमध्ये मला माझं बालपण दिसतंय, तर काहींमध्ये मी सासरी जाणार म्हणून होणारी घालमेल!!! त्या सगळ्यांना मी माझ्या हृदयाच्या कुपीत कायम जपून ठेवणार! सणावाराला येईन आवर्जून, तुझी भेट घ्यायला, तुही मग तयार रहा,आपलं नेहमीचं हितगुज करायला, सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही तुझी आठवण मात्र कायम येईल.

View this post on Instagram
 
A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

प्रथमेशच्या कमेंटने वेधलं लक्ष

क्षितीजाच्या या पोस्टवर प्रथमेशच्या कमेंटने विशेष लक्ष वेधलं आहे. प्रथमेशने कमेंट करत म्हटलं की, किती छान ..तुला इकडे एवढं प्रेम देऊ की तुला दोन्ही घर आपली वाटतील. सध्या या दोघांच्या घरी लग्नाची धामधुम सुरु आहे. तसेच आजच हे जोडपं लग्नबंधनात अडकून त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. 

ही बातमी वाचा : 

Crew First Look poster: बॉक्स ऑफीसवर बॉलीवूडच्या तारका दाखवणार झलवा, करिना कपूर,तब्बू आणि क्रिती सेनॉनच्या 'द क्रू'मधील लूकने वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget