Premachi Goshta Marathi Serial Updates : लकीच्या एमबीए रिझल्टचे बिंग फुटणार, आदित्यला लागली सागरची ओढ; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहाल?
Premachi Goshta Marathi Serial Updates : आदित्यला आपल्या वडिलांच्या प्रेमाची ओढ लागली आहे. मुक्ताचा सागरवर राग कायम आहे पण तिच्या स्वभावानुसार ती सागरची काळजी घेताना दिसणार आहे.
![Premachi Goshta Marathi Serial Updates : लकीच्या एमबीए रिझल्टचे बिंग फुटणार, आदित्यला लागली सागरची ओढ; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहाल? Premachi Goshta Marathi Serial Updates marathi serial updates latest updates star pravah marathi serial premachi goshta latest episode highlights Premachi Goshta Marathi Serial Updates : लकीच्या एमबीए रिझल्टचे बिंग फुटणार, आदित्यला लागली सागरची ओढ; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहाल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/fbfc1f2498d90b4a09f90dd4a0be58041712555902157290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Premachi Goshta Marathi Serial Updates : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये लकीचे बिंग फुटणार आहे. तर, दुसरीकडे आदित्यला आपल्या वडिलांच्या प्रेमाची ओढ लागली आहे. मुक्ताचा सागरवर राग कायम आहे पण तिच्या स्वभावानुसार ती सागरची काळजी घेताना दिसणार आहे.
सावनी आदित्यला सागरवर विश्वास ठेवू नको असे म्हणते. त्यावर आदित्य आपण सागरसोबत एकत्र बसून बोलुयात असे सांगतो. आपणही चुकीचे असू शकतो. माझ्याजवळ माझे वडील नाही आणि त्यांच्याकडे त्यांचा आदित्य नाही असे आदित्य म्हणतो. आदित्य सागरच्या बाजूने बोलत असल्याचे पाहून सावनीचा तिळपापड होतो.
मुक्ताची सागरवर नाराजी कायम आहे. नाराजी दूर करण्यासाठी सईमध्ये आणू नका असे मुक्ता सागरला बजावते. गुन्ह्याला माफी नसते असे तिला म्हणते.
मुक्ता घेणार सागरची काळजी
इंद्रा सागरला हाताला मार लागल्यामुळे त्याच्यासाठी आयुर्वेदिक तेल घेऊन येते आणि मुक्ताला लावायला सांगते. इंद्रा तिथून निघून गेल्यावर सागर तिला म्हणतो की आईने सांगितले आहे म्हणून प्रत्येक गोष्ट करायची गरज नाही. सागर ते तेल स्वतः लावायचा प्रयत्न करत असतो. पण, त्याला जमत नाही. हे पाहून मुक्ता सागरला मदत करते आणि तेलाचा मसाज करते.
सागर दाखवणार सावनीला इंगा
पहाटेच्या मिटिंगसाठी सावनी येते. पण, सागर ऐनवेळी मिटिंग रद्द करतो आणि सकाळी 8 वाजता मिटिंगला घरी येण्याचा निरोप देतो. सावनी सकाळी आठ वाजता सागरच्या घरी येते. त्यावेळी इंद्रा दरवाजा उघडते. इंद्रा सावनीला घरात घेण्यास तयार नसते. सावनी आता पुन्हा एकदा घरात आग लावणार, सईला भेटण्याचा प्रयत्न करणार असे इंद्राला वाटते. त्यामुळे सावनीला घरात प्रवेश देत नाही.
लकीचा रिझल्ट समोर
इंद्रा लकीच्या रुममध्ये जाते आणि त्याची बॅग धुण्यासाठी घेते. त्यावेळी त्यातील कागदपत्रे बाहेर काढते. त्यावेळी मुक्ताच्या हाती लकीचा रिझल्ट लागतो. यामध्ये लकी नापास झाला असल्याचे मुक्ताला कळते. बॅगेची जागा बदलल्याने लकी कावरा बावरा होतो आणि रिझल्ट शोधतो. तेवढ्यात मुक्ता येते आणि लकीसमोर त्याचा रिझल्ट धरते. आपलं पितळ उघड पडल्याने लकी टेन्शनमध्ये येतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)