एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : अंधाराचा फायदा घेत कार्तिक डाव साधणार; सागर होणार मुक्ताचा नोकर

Premachi Goshta Serial Update : नाराज असलेल्या मुक्ताची समजूत काढण्यासाठी सागरचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे कार्तिक अंधाराचा फायदा घेत मुक्तासोबत लगट करण्याचा प्रयत्न करतो.

Premachi Goshta Serial Update :  नाराज असलेल्या मुक्ताची समजूत काढण्यासाठी सागरचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे कार्तिक अंधाराचा फायदा घेत मुक्तासोबत लगट करण्याचा प्रयत्न करतो. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेतील आजच्या एपिसोडमध्ये मुक्ताच्या प्रेमासाठी आसुसलेला सागर दिसणार आहे.

सागर होणार मुक्ताचा नोकर!

दुखावलेल्या मुक्ताची समजूत काढण्यासाठी सागरचे प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी तो खूप धडपड करत असतो. आता, मुक्ताच्या क्लिनिकमध्ये सागर नोकर म्हणून जातो. मुक्तासाठी तो डबा आणतो. वेश बदलून आलेल्या सागरला मुक्ता ओळखते. मुक्ता सागरने आणलेला डबा जेवण्यास नकार देते. आरतीदेखील मुक्ताला जेवून घेण्यास सांगते. पण, मुक्ता आरतीवर चिडते आणि पुढील पेशंटला पाठवण्यास सांगते. 

तु्म्हाला हा  सगळा भावनांचा खेळ वाटतो का, एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडणं कठीण असते असे मुक्ता चिडून सांगते. सागरवर नाराज झालेली मुक्ता क्लिनिकमधून निघून जाते. सावनी आदित्यला आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करते. सावनी आदित्यचे कौतुक करून मी पण सागरला माफ करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगते. 

अंधाराचा फायदा घेत कार्तिक डाव साधणार

घरात अंधाराचा फायदा घेत कार्तिक मुक्ताला मिठी मारतो आणि लगट करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मुक्ता आरडोओरड करते. लाईट लावल्यानंतर मुक्ता कार्तिकला ओरडते. कार्तिक आपली चूक झाल्याचे सांगत माफी मागतो. मी स्वातीला असेच सरप्राईज देतो असे सांगतो. तेवढ्यात स्वाती येते. मात्र, मुक्ता त्याबद्दल स्वातीला काहीही सांगत नाही. 

इंद्राकडून घरात मांसाहारी जेवण, सागर होणार नाराज

रात्रीच्या जेवणासाठी इंद्रा घरात चिकन करते. मुक्तासाठी कोणतेही शाकाहारी जेवण बनवत नाही. इंद्रा मुक्ताला बोल लावते. त्यावर सागर नाराजी व्यक्त करत जेवणार नसल्याचे सांगतो. मुक्तासाठी एखादी भाजी करायला हवी होती, पण एखाद्याला उपाशी का ठेवावं असे सागर बोलतो आणि न जेवता पंगतीतून उठून जातो.सागर उठून गेल्यानंतर सईदेखील उठून जाते. बापू देखील मुक्ताची बाजू घेत इंद्राला बोलतात.सागर मुक्ताला जेवण करण्याचा आग्रह करतो. पण, मुक्ताची नाराजी कायम असते. तेवढ्यात सई शेजारच्या काकूकडून शाकाहारी जेवण आणते आणि मुक्ताच्या चेहऱ्यावर हास्य उमटते. 

पाहा व्हिडीओ :Premachi Goshta | Latest Episode 193 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget