(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Premachi Goshta Latest Episode : सागरने दिली मुक्ताची साथ, सत्य समोर येऊनही इंद्राचा मुक्तावर राग
Premachi Goshta Latest Episode : आज प्रसारीत होणाऱ्या एपिसोडमध्ये स्वाती आणि तिचा नवरा त्यांच्यावर ओढावलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी मुक्ताने केलेल्या मदतीबाबत सांगतो.
Premachi Goshta Latest Episode : 'प्रेमाची गोष्ट ' (Premachi Goshta) मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये कुटुंबात, नात्यातील विश्वासाचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. आज प्रसारीत होणाऱ्या एपिसोडमध्ये स्वाती आणि तिचा नवरा त्यांच्यावर ओढावलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी मुक्ताने केलेल्या मदतीबाबत सांगतो. तर, दुसरीकडे सागर मुक्ताला आपण असताना दागिने विकण्याची वाईट येणार नसल्याचे विश्वासाने सांगतो.
मागील एपिसोडमध्ये सागर हा स्वाती आणि कार्तिकला घरी आणतो. आजच्या एपिसोडमध्ये कार्तिकने ओढावलेल्या प्रसंगाबाबत सांगतो. सोन्याचे दागिने हे मुक्ताने आमच्या मदतीसाठी आणले होते, असे स्वातीचा नवरा कार्तिक सांगतो. तर, स्वाती घडलेला सगळा प्रकार कुटुंबीयांना सांगतो. मुक्ताने आम्हाला मदतीसाठी दागिने आणले, एफडी, सेव्हिंग मोडल्या असल्याचे कार्तिक-स्वाती सांगतात. स्वाती-कार्तिक सत्य परिस्थिती सांगत असताना दुसरीकडे मु्क्ताच्या आईच्या डोळ्यात मुलीबद्दलचा अभिमान दिसून येतो.
सागरला कसा आला संशय
मुक्ताने दागिने कशासाठी नेले होते, याचा शोध सागरला घ्यायचा असतो. सत्य कसे जाणले याबद्दलही सागर घरातील लोकांना सांगतो. मुक्ता सईचे नाव घेऊनही काही सांगत नाही म्हटल्यावर मी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि सत्य समोर आणले असल्याचे सागर सांगतो. ज्याच्या नावाचे मंगळसूत्र घातले त्याला तरी किमान सांगावे असे सागर मुक्ताला सांगतो. मी असेपर्यंत तरी घरातील तुमचे दागिने विकण्याची वेळ येणार नसल्याचे सागर मुक्ताला सांगतो.
इंद्राला सुनावले...
सत्य समोर येताच मुक्ताची आई इंद्राला सुनावते. माझी मुलगी स्वत:चा पदर फाडून इतरांना ठिगळ लावते असे मुक्ताची आई सांगते. इंद्राताई आता झापडं काढा आणि समोरच्या माणसाला ओळखा असे मुक्ताची आई सांगते.
मुक्ताची आई तिला पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी विचारते. त्यावेळी मुक्ता आईचे म्हणणे नाकारते आणि हे माझे भरलेलं घर कसं सोडून येऊ असे म्हणते.
सागरचे वडील आपली सून शंभर नंबरी सोनं आहे, तू काय काय ते बोलत होतीस असे इंद्राला म्हणतात.
इंद्राचा मुक्तावर राग...
इंद्राचा मुक्तावर राग व्यक्त करते. मुक्ताने काहीच न सांगितल्याने मुलगी-जावईला दुसरीकडे राहावे लागले असल्याचे इंद्रा म्हणते. त्यावर सागरचे वडील इंद्रावर नाराज होतात आणि देवाला तरी घाबर असे म्हणतात. सुनेचे कौतुक वाटलं पाहिजे असेही इंद्राला म्हणतात.