एक्स्प्लोर
सनी लिओनविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा करण्यात आला आहे. बिग बॉसची स्पर्धक पूजा मिश्राने सनीविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला आहे.
बिग बॉसच्या पाचव्या पर्वामध्ये रेडिओ जॉकी असलेली पूजा मिश्रा सहभागी झाली होती. त्याच पर्वात सनीला वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली. आपल्या लोकप्रियतेमुळे जळफळाट होऊन सनीने प्रसारमाध्यमांसमोर आपल्याविरोधात वक्तव्य केल्याचा दावा पूजाने केला. यामुळे आपलं 70 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं तिने म्हटलं आहे.
त्याचप्रमाणे समाजात आपली प्रतिमा मलीन झाल्याचा दावाही पूजा मिश्राने केला आहे. त्यामुळे सनी लिऑनला अटक करण्याची मागणीही तिने केली आहे.
विशेष म्हणजे पूजाने आपल्या आई-वडिलांविरोधातही मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. हा अर्ज कोर्टाने फेटाळल्यानंतर तिच्या आई-वडिलांनीही आपल्या लेकीविरोधात कोर्टात अर्ज केला. पूजाच्या निरर्थक दाव्यांकडे कोर्टाने लक्ष देऊ नये, असं यात म्हटलं होतं.
दोन्ही पक्षांतर्फे कोणीही हजर न राहिल्यामुळे मुंबई हायकोर्टातील सुनावणी जून महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement