एक्स्प्लोर

'लागिरं झालं जी'तील कलाकारांचे फोटो छापणं आयोजकाला महागात

'लागिरं झालं जी' मालिकेच्या कलाकारांना या कार्यक्रमाबाबत कोणतीही कल्पना नव्हती. ही बाब सोशल मीडियातून या मालिकेतील कलाकार आणि दिग्दर्शक धोंडीबा करांडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी इतर कलाकारांकडे याबाबत चौकशी करत याची माहिती घेतली.

सांगली : 'लागिरं झालं जी' मालिकेतील कलाकारांचे फोटो कार्यक्रम पत्रिकेवर छापणं सांगलीतील आयोजकाला चांगलंच महागात पडलं आहे. परवानगीशिवाय फोटो छापल्याप्रकरणी मालिकेच्या कलाकाराने सातारा पोलिस ठाण्यात सांगलीच्या वाळवा भागातील आयोजकाविरोधात तक्रार दाखल केली. आयोजकांनी एका मध्यस्थीच्या करवी बोलणी झाल्यामुळे फोटो छापल्याचा दावा केल्याने या प्रकरणावर तूर्त पडदा पडला आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील माळभागमधील 'राजमाता जिजाऊ अकॅडमी' यांच्याकडून शहीद जवानांच्या स्मरणार्थ पाच जानेवारी रोजी गावात 'सुरेल हिंदी गीतोंका संस्कार जागो हिंदुस्थानी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत गणगटे यांची काही दिवसांपूर्वी सत्यप्पा मोरे नावाच्या व्यक्तीची ओळख झाली आणि मोरे यांनी गणगटे यांना 50 हजार रुपयात त्यांच्या कार्यक्रमासाठी 'झी मराठी' वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'लागिरं झालं जी'चे कलाकार धोंडिबा करांडे, किरण राणे, निखिल चव्हाण, संदीप जंगम यांना आणण्याची बोलणी झाली. मध्यस्थाच्या आश्वासनामुळे गणगटे यांनी सर्व कलाकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार, अशी कार्यक्रम पत्रिका आणि प्रवेशिका फोटोसहित छापल्या. तीनशे रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत तिकीट शुल्क लावण्यात आलं आणि सोशल मीडियावर तिकिटाचे फोटो आणि पत्रिका वायरल केली. लागिरं झालं जी'तील कलाकारांचे फोटो छापणं आयोजकाला महागात दरम्यान, 'लागिरं झालं जी' मालिकेच्या कलाकारांना या कार्यक्रमाबाबत कोणतीही कल्पना नव्हती. ही बाब सोशल मीडियातून या मालिकेतील कलाकार आणि दिग्दर्शक धोंडीबा करांडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी इतर कलाकारांकडे याबाबत चौकशी करत याची माहिती घेतली. मात्र कोणत्याच कलाकाराला याची कल्पना नसल्याने करांडे यांनी सातारा पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेत विनापरवानगी फोटो आणि नावे छापल्याबाबत तक्रार दाखल केली. सातारा पोलिसांनी आयोजक श्रीकांत गणगटे यांना पाचारण करत याबाबत चौकशी केली असता, आपण मोरे यांच्याशी बोलणी करुन त्याआधारे पत्रिका छापून सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा दावा केला. त्यामुळे करांडे यांनी गणगटे यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेतली आहे. दरम्यान सत्यप्पा मोरे यांची चौकशी करुन कायदेशीर कारवाईची मागणी करांडे यांनी केली आहे. तर आयोजक असणाऱ्या श्रीकांत गणगटे यांना आता कलाकारांविना हा कार्यक्रम होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विद्यमान अपक्ष आमदार शरद पवारांच्या गळाला, आज पक्षप्रवेश करणार; उमेदवारीही निश्चित
विद्यमान अपक्ष आमदार शरद पवारांच्या गळाला, आज पक्षप्रवेश करणार; उमेदवारीही निश्चित
Akola East Assembly Election 2024: अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटासाठी चढाओढ, बंडखोरांना रोखण्याचं आव्हान
अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटासाठी चढाओढ, बंडखोरांना रोखण्याचं आव्हान
Anna Bansode: पक्षांतर्गत अन् महायुतीचा विरोध डावलला? अण्णा बनसोडेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर; नाराज गट प्रचारात दिसणार?
पक्षांतर्गत अन् महायुतीचा विरोध डावलला? अण्णा बनसोडेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर; नाराज गट प्रचारात दिसणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 23 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaKopargaon Vidhan Sabhaकोपरगाव मतदारसंघातला वाद थेट दिल्ली दरबारी,कोल्हे परिवाराने घेतली शाहांची भेटNCP Ajit Pawar Candidate List :अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, 38 उमेदवारांचा समावेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विद्यमान अपक्ष आमदार शरद पवारांच्या गळाला, आज पक्षप्रवेश करणार; उमेदवारीही निश्चित
विद्यमान अपक्ष आमदार शरद पवारांच्या गळाला, आज पक्षप्रवेश करणार; उमेदवारीही निश्चित
Akola East Assembly Election 2024: अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटासाठी चढाओढ, बंडखोरांना रोखण्याचं आव्हान
अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटासाठी चढाओढ, बंडखोरांना रोखण्याचं आव्हान
Anna Bansode: पक्षांतर्गत अन् महायुतीचा विरोध डावलला? अण्णा बनसोडेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर; नाराज गट प्रचारात दिसणार?
पक्षांतर्गत अन् महायुतीचा विरोध डावलला? अण्णा बनसोडेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर; नाराज गट प्रचारात दिसणार?
Priyanka Gandhi : प्रियांका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाल्या, वडील, आई, भावासाठी 35 वर्षे प्रचार केला, पण आता..
प्रियांका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाल्या, वडील, आई, भावासाठी 35 वर्षे प्रचार केला, पण आता..
समीर भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? नांदगावमधून उमेदवारी मिळणार का? नेमकं काय म्हणाले भुजबळ?
समीर भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? नांदगावमधून उमेदवारी मिळणार का? नेमकं काय म्हणाले भुजबळ?
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
Amit Shah: महायुतीत तिकीट कापलं, नाराज माजी आमदाराने दिल्ली गाठलं; अमित शाहांची मध्यस्थी
महायुतीत तिकीट कापलं, नाराज माजी आमदाराने दिल्ली गाठलं; अमित शाहांची मध्यस्थी
Embed widget