एक्स्प्लोर

Share Market Update : भारतीय शेअर बाजारात 'या' पाच कारणांमुळं तेजी, सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, निफ्टी 26 हजारांच्या पार, मार्केट बंद होताना चित्र बदललं

Share Market Today :भारतीय शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स सुरुवातीच्या वेळी सेन्सेक्समधील तेजीला ब्रेक लागला होता, मात्र त्यानंतर पुन्हा वाढ झाली. निफ्टीनं 26 हजारांचा टप्पा पार केला. 

मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली.सुरुवातीच्या वेळी सेन्सेक्समध्ये 138 अंकांची घसरण झाली होती, तेव्हा निर्देशांक 84328.15 अंकांपर्यंत पोहोचला होता. तर, निफ्टीमध्ये देखील घसरण झाली होती. निफ्टीत सुरुवातीच्या वेळी 38 अंकांची घसरण होऊन तो 25837.30 अंकांवर पोहोचला होता. दुपारच्या वेळी पुन्हा एकदा सेन्सेक्समध्ये 600 अंकांची तेजी पाहायला मिळाली. मात्र, सेन्सेक्समध्ये तेजी फार वेळ टिकू शकली नाही. 

सेन्सेक्समध्ये सुरुवातीला तेजी पाहायला मिळाली होती. ती बाजार बंद होताना कमी झाली. निफ्टी निर्देशांक 3.35 अंकांच्या किरोकळ वाढीसह 25879.15 अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्समध्ये 12.16 अंकांची वाढ होऊन तो 84478.67 अंकांवर बंद झाला. निफ्टीवर एशियन पेंटस, इंटरग्लोब एविएशन, आयसीआयसीआय बँक, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस, टाटा स्टील सारख्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. 

Share Market Update: आरबीआयकडून रेपो रेट कपातीची शक्यता 

ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दर घटून 0.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआय डिसेंबरमध्ये पतधोरणविषयक समितीची बैठक घेणार आहे. त्यावेळी व्याज जरात आणखी कपात होऊ शकते. सप्टेंबरमध्ये  सीपीआय आधारीत महागाई दर 1.44 टक्के होता. जो ऑक्टोबर 2024 मध्ये 6.21 टक्के होता. 

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख गुंतवणूक रणनीतीकार वीके विजयकुमार यांनी महागाई दरातील एवढी घसरण पाहता डिसेंबरच्या पतधोरण समितीत रेपो रेटमध्ये कपातीच शक्यता वर्तवली आहे.

जागतिक बाजारात मजबूत संकेत

आशियाई शेअर बाजारात म्हणजेच चीनच्या शांघाई SSE कंपोझिट इंडेक्स आणि जपानचा निक्केई 225 तेजीसह बंद झाले. अमेरिकेच्या शेअर बाजारात तेजी दिसून आली त्याचा देशांतर्गत गुंतवणूकदारांवर परिणाम झाला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचे दर गुरुवारी 0.13 टक्क्यांनी घसरुन 62.63 डॉलर प्रति बॅरल स्तरावर आले. तेल दरात घसरण झाल्यास भारतासारख्या मोठ्या आयातदार देशाला फायदा होता. 

भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेचे संकेत देणाऱ्या इंडिया वोलॅटिलिटी इंडेक्स मध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सध्या हा निर्देशांक 11.92 वर आला आहे. वोलॅटिलिटी इंडेक्समधील घसरण शेअर बाजारातील स्थिरता दर्शवतो. 

बिहारमध्ये एनडीए जिंकणार असल्याचे अंदाज एक्झिट पोलमध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारांवरील परिणाम दिसून आला आहे. ऑसिलेटरनं निफ्टी  निर्देशांक 26130 ते 26550 अंकांपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता आहे, असं म्हटलं आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget