एक्स्प्लोर

'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला

स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी याला "हकालपट्टी साजरी करणाऱ्यांच्या तोंडावर दिलेली सणसणीत चपराक" दिली असल्याचे म्हटले आहे.

Amol Mitkari: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भाषेत विरोधकांना चांगलाच चिमटा काढला आहे. प्रवक्ते पदावरून हटवल्यानंतर आज पक्षाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचा समावेश झाल्यानंतर मिटकरी यांनी याला "हकालपट्टी साजरी करणाऱ्यांच्या तोंडावर दिलेली सणसणीत चपराक" दिली असल्याचे म्हटले आहे. यावेळी मिटकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेली 'मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा...’  शायरी म्हणत हल्लाबोल केला. 

दादा म्हणाले, कोणावरही अन्याय होणार नाही

मिटकरी म्हणाले, “वक्तृत्व कलेमुळेच अजितदादांनी मला पहिली संधी दिली होती. तेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ठामपणे मांडत आलो आहे. आजही पक्षाच्या विचारधारेबद्दल माझी निष्ठा अबाधित आहे. असं कोणतं वादग्रस्त विधान मी केलं ज्यामुळे मला हटवलं, हेच समजत नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “नव्या प्रवक्त्यांच्या यादीत नाव नसल्यामुळे थोडं वाईट वाटलं, पण मी दादांशी स्वतः बोललो. दादा म्हणाले की, कोणावरही अन्याय होणार नाही. आज जेव्हा स्टार प्रचारकांच्या यादीत माझं नाव आलं, तेव्हा स्पष्ट झालं की पक्ष माझ्यावर विश्वास ठेवतो.”

पक्षाने दिलेली सणसणीत चपराक 

अजित पवारांविषयी मिटकरी म्हणाले, “माझ्या पक्षाने मला जबाबदारी दिली आहे, ती मी पूर्ण जबाबदारीने पार पाडणार आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर या विचारसरणीशी बांधिल राहून मी पक्षाचा प्रचार करणार आहे.” मिटकरी यांनी आपल्याविरोधात बोलणाऱ्यांना चांगलाच टोला लगावला. “हकालपट्टी शब्द वापरल्यानंतर ज्यांना गुदगुद्या झाल्या, त्यांना ही पक्षाने दिलेली सणसणीत चपराक आहे. कोणाचाही अंत पाहू नये, कारण राजकारणात वळणं येतात. पण सत्य आणि निष्ठा कायम एकाच दिशेने उभं राहतात,” असे ते म्हणाले.

पदावरून बाजूला करताच नवीन संधी दिली

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी भाकरी फिरवत अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आणखी दोन प्रवक्त्यांना पदमुक्त केले होते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे अजित पवारांनी मिटकरी यांची उचलबांगडी केल्याची जोरदार चर्चा रंगली. मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमधील पक्षांमध्ये कटुता निर्माण होते, अशी कुजबुज होती. त्यामुळेच अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांना कार्यमुक्त केले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अवघ्या काही दिवसांतच अजित पवार यांनी अमोल मिटकरी यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget