एक्स्प्लोर

34 वय झालंय तरी लग्न जुळना, शरद पवारांना पत्र लिहिणारा मंगेश काय म्हणतो, शिक्षण किती, काय करतो?

अकोल्यातील या लग्नाळू मुलाने पत्रात स्वतःचा मोबाईल नंबर आणि पत्ता दिल्याने शरद पवार व व्यासपीठावरील नेते काही क्षण अवाक् झाले होते.

अकोला : ग्रामीण महाराष्ट्रात तरुणांच्या लग्नाचा (Marriage) प्रश्न गंभीर बनला असून लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने वेगळ्याच तणावात ही तरुणाई असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, 8 नोव्हेंबर रोजी अकोला (Akola) दौर्‍यावर असलेल्या राष्ट्रवादीचे प्रमुख तथा खासदार शरद पवारांना (Sharad pawar) एका तरुणाने एक भावनिक पत्र दिले. “माझे वय वाढत चालले आहे. भविष्यात माझे लग्न होणार नाही, अशी भीती वाटते. मी एकाकीपणामुळे त्रस्त झालो आहे. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायला तयार आहे. तिथे काम करून संसार नीट चालवीन, याची मी हमी देतो. कृपया माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. तुम्ही मला जीवनदान द्याल. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही,” असा आशय या पत्रात होता. आता, तो तरुन एबीपी माझ्याच्या कॅमेऱ्यासमोर आला असून त्याने पुन्हा एकदा आपलं गाऱ्हाणं मांडलं.

अकोल्यातील या लग्नाळू मुलाने पत्रात स्वतःचा मोबाईल नंबर आणि पत्ता दिल्याने शरद पवार व व्यासपीठावरील नेते काही क्षण अवाक् झाले होते. या पत्राची चर्चा अकोल्यातच नव्हे, तर सोशल मीडियावरही जोरदार झाली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांकडून जिल्हा पदाधिकाऱ्यांना या तरुणाला मदत करण्याचे निर्देश देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले की, “आम्हाला या तरुणाला मदत करण्यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठांकडून आदेश मिळाले आहेत. लवकरच आम्ही त्याच्यासाठी योग्य वधू संशोधन सुरू करणार आहोत. त्याचे आयुष्य सेटल करण्याची जबाबदारी आमचा पक्ष घेणार आहे, असेही त्यांनी म्हटले.

मंगेश बीए पदवीर, शरद पवारांना दिलं पत्र (akola mangesh marriage)

अकोल्यातील मंगेश इंगळे या तरुणाने शरद पवारांना पत्र लिहिलं होतं. वयाच्या 34 व्या वर्षीही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली होती. आपण कोणत्याही अटीविना लग्न करण्यास तयार असून माझं लग्न जुळवून द्या, आपले उपकार आयुष्यभर विसरणार नाही अशी विनंती या तरुणाने शरद पवारांकडे केली होती. पवार साहेबांना एखादं काम म्हटलं की ते काम होतं, म्हणून मी त्यांच्याकडे ते पत्र दिलं. माझी आणि पवार साहेबांची भेट झाली नाही, पण त्यांच्या पीएकडे मी ते पत्र दिलं होतं, असेही त्याने सांगितले. मंगेश हा बीए पदवीधर असून आता एमए करत आहे, तो स्विगीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याच्या घरात आई, दोन भाऊ आणि एक बहिण असं कुटंब असल्याचंही त्यांने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

हेही वाचा

हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं VSR चा मालक रोहित सिंहला अटक करावी, अन्यथा राष्ट्रवादी लढा उभारेल, अमोल मिटकरी आक्रमक 
सरकारनं VSR चा मालक रोहित सिंहला अटक करावी, अन्यथा राष्ट्रवादी लढा उभारेल, अमोल मिटकरी आक्रमक 
अकोला महापालिकेत स्थायीसह तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व, तर एक प्रभाग समिती काँग्रेसकडे
अकोला महापालिकेत स्थायीसह तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व, तर एक प्रभाग समिती काँग्रेसकडे
Akola Crime: अकोल्यात ठाकरे गटाच्या शहर प्रमुखावर प्राणघातक हल्ला; अज्ञातांनी कारच्या काचा फोडल्या, आमदार नितीन देशमुखांचा गंभीर आरोप
अकोल्यात ठाकरे गटाच्या शहर प्रमुखावर प्राणघातक हल्ला; अज्ञातांकडून वाहनाची तोडफोड, आमदार नितीन देशमुखांचा गंभीर आरोप
धक्कादायक! अकोल्यात आयशरची दुचाकीला जोरदार धडक, तीन अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू 
धक्कादायक! अकोल्यात आयशरची दुचाकीला जोरदार धडक, तीन अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू 

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Embed widget