Bigg Boss Marathi New Season Paddy Kamble Abhijeet Sawant : जैसे कर्म तैसे फळ! निक्कीची बाजू घेणाऱ्या अभिजीतला पॅडीदादाने लगावला टोला...
Bigg Boss Marathi New Season Paddy Kamble Abhijeet Sawant : घरातील ग्रुप बी मधील पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादाने अभिजीतसोबत गप्पा मारताना त्याला टोला लगावला आहे.
Bigg Boss Marathi New Season Paddy Kamble Abhijeet Sawant : बिग बॉस मराठीने आता खेळाच्या पाचव्या आठवड्यात प्रवेश केला आहे. आता बिग बॉसमध्ये चुरस निर्माण झाली आहे. घरातील सदस्ये आपल्या खऱ्या रंगात येऊ लागली असून समीकरणेही बदलत आहेत. घरातील दोन गटांमध्येही आपआपसात संशयाचे वातावरण आहे. या आठवड्यातही ग्रुपची समीकरणे, सदस्यांच्या गेम प्लानमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. घरातील ग्रुप बी मधील पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादाने अभिजीतसोबत गप्पा मारताना त्याला टोला लगावला आहे.
घरातील सदस्यांमधील नाते, परस्पर असलेला विश्वास प्रत्येक दिवशी बदलताना दिसत आहेत. निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकरची 30 दिवसांची मैत्री एका दिवसात संपली. तर, दुसरीकडे अरबाज पटेल आणि निक्कीच्या मैत्रीमध्ये देखील अभिजीतमुळे दुरावा आला आहे. निक्की आणि अभिजीतची जोडी आता घरात कोणता नवीन डाव मांडणार, हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. प्रत्येक सदस्याच्या डोक्यात वेगळीच प्लानिंग सुरु असल्याचे दिसत आहे. निक्की टीम 'बी' मधल्या पॅडी दादा, अभिजित आणि सूरज यांच्या सोबत बोलताना दिसत आहे.
घरामध्ये पॅडी दादा अभिजीतला म्हणत आहेत की ," तुझ्यावर जर अरबाजसारखी वेळ आली तर कॅप्टनसी दुसऱ्याला द्याची तर ती तू मला दे.. "त्यावर निक्की हसून म्हणते की ," आता तर मी हक्काने म्हणू शकते की, तू माझा विचार कर.या सगळ्यावर अभिजित पॅडी दादांना म्हणतो की," मला तुमच्या सगळ्यांबद्दल मनात खूप प्रेम आहे. पण तुम्ही आता तसे नाही राहिलात. एखाद्या माणसाला जर तुम्हाला त्रास द्याचा असेल तर तुम्ही तो दिला आहे. तुम्ही निक्कीला देखील त्रास देत आहेत. आमच्या दोघानां पण टार्गेट केले जात आहे. त्यावर पॅडी दादा म्हणत आहे ,"आपण जे वागलो आहे तेच आपल्याला परत मिळत असते आणि आम्ही त्रास नाही देत गंमतीच करत आहोत जसे तू करायचास."
View this post on Instagram
निक्कीने ग्रुप ए मधील सदस्यांशी फारकत घेतली आहे. आता, अभिजीतही ग्रुप बी सोबत फारकत घेणार का, निक्की आणि अभिजीत घरात नवा ग्रुप बनवणार का, हे काही दिवसातच स्पष्ट होईल.