एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel : निक्कीच्या बोलण्याने अरबाजच्या फीलिंग्ज हर्ट; घरात आदळआपट-तोडफोड, बिग बॉस काय करणार?

Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel : अरबाज आणि निक्कीमध्ये जोरदार वादावादी झाली असून अरबाजने या रागातून घरातील वस्तूंची आदळाआपट केली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात महिन्याभरातच नात्यांची चक्र फिरली आहेत. सोमवारच्या एपिसोडमध्ये 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना जोड्यांच्या बेडीत अडकवले आहे. निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अभिजीत सावंतची (Abhijeet Sawant) एक जोडी आहे. निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीचा परिणाम गेमवर होणार असल्याचा आक्षेप दोन्ही ग्रुपमधील सदस्यांना आहे. त्यामुळे आता या जोडीमुळे घरात काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे  वीकेंडला झालेल्या 'भाऊचा धक्का'मध्ये काही गोष्टी उघड झाल्याने ग्रुप ए फुटला आहे. आता अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि निक्कीमध्ये जोरदार वादावादी झाली असून अरबाजने या रागातून घरातील वस्तूंची आदळाआपट केली आहे. 

अरबाज पटेलची निक्कीवर चिडचिड...घरात आदळआपट....

बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. निक्की आणि अभिजीतची दिल दोस्ती दुनियादारी अरबाजला मात्र खूप खटकत आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये निक्की आणि अभिजीत पोळी बनवताना दिसत आहे. दरम्यान निक्की हसल्यामुळे अरबाज तिला "हसत आहेस", असं म्हणत  भांडी फोडतो. त्यावर निक्की म्हणते,"काय आहे याचा बालीशपणा.''

अरबाज म्हणतो की तू मला अशा वागण्याने हर्ट करत आहेस. निक्की म्हणते की, तुला माझी गरज नाही आहे". यावर अरबाज म्हणतो,"नाही आहे... आता हे पाहून तर अजिबातच नाही". अरबाजला उत्तर देत निक्की म्हणते, "हे असं स्पष्ट बोलायचं माझ्यासोबत".  निक्की आणि अभिजीतची मैत्री पाहणं अरबाजला सहन होत नाही. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात तो दुखावला आहे. भांडी फोडून, वस्तूंची आदळाआपट करताना प्रोमोत दिसला आहे. निक्कीवर संतापलेल्या अरबाजला घरातील इतर सदस्य शांत करताना दिसून येत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसच्या घरातील वस्तूंचे नुकसान केल्याने बिग बॉस घरातील सदस्यांवर कठोर कारवाई करतात. याआधीच्या सीझनमध्ये काही सदस्यांना घरातील जेलमध्येही टाकण्यात आले आहे. सध्या जान्हवी ही तिच्या वर्तवणुकीमुळे जेलमध्ये आहे. आता अरबाजने घरातील वस्तूंची तोडफोड केल्याने बिग बॉस त्याच्यावर कोणती कारवाई करतील, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : महाराष्ट्र काँग्रेसच्या न्याय पत्रात काय असेल? तीन पातळ्यांवर असणार काँग्रेसचा जाहीरनामाZero Hour : नागपुरात भाजपला धक्का बसण्याची शक्यता, भाजपच्या विदर्भ सर्व्हेत धक्कादायक आकडेZero Hour Guest:विदर्भात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा? मविआचं प्लॅनिंग काय?Sachin Sawant गेस्ट सेंटरवरZero Hour : भाजपच्या विदर्भ सर्व्हेत धक्कादायक आकडे, मविआकडून भाजपच्या सर्व्हेवर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Port Blair Renamed Sri Vijaya Puram : देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता  'श्री विजयपूरम'
देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'श्री विजयपूरम'
Embed widget