एक्स्प्लोर

Nilesh Sable New Comedy Show : ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाची तारीख बदलली, निलेश साबळे आणि टीम 'या' दिवसापासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Nilesh Sable New Comedy Show : कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाची तारीख बदलली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

 Nilesh Sable New Comedy Show : छोट्या पडद्यावर सध्या अनेक नव्या मालिकांचा आणि कार्यक्रमांचा सिलसिला सुरु आहे. त्यातच अनेक कार्यक्रम आणि जुन्या मालिका या प्रेक्षकांचा निरोप घेतायत.  काही दिवसांपूर्वी  झी मराठी वाहिनीवरून 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याआधी या कॉमेडी शोमधून निलेश साबळेने एक्झिट घेतली होती. डॉ. निलेश साबळेने (Dr. Nilesh Sable) शो सोडल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यानंतर निलेश साबळेच्या एका नव्या कार्यक्रमाची घोषणा झाली तेही नव्या वाहिनीवर. 

‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’ या मालिकांनंतर कलर्स मराठी आता विनोदाचा ॲटमबॅाम्ब फोडणार आहे. डॉ. निलेश साबळे याच्याबरोबर विनोदाची नवी सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठीवर धावणार आहे.  ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’  या कार्यक्रमातून डॉ. निलेश साबळे, ओमकार भोजने आणि भाऊ कदम ही मंडळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण या मंडळींच्या तारखेत सध्या बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम 20 एप्रिलपासून सुरु होणार होता. 

कार्यक्रमाच्या तारखेत बदल

दरम्यान नुकतच कलर्स मराठी वाहिनीकडून या कार्यक्रमाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कार्यक्रमाची तारीख ही 27 एप्रिल सांगण्यात आली आहे. त्यामुळे 20 एप्रिलपासून प्रदर्शित होणारा हा कार्यक्रम येत्या 27 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर आलं आहे. आता या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्येही बरीच उत्सुकता पाहायला मिळतेय. 

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

नव्या कॉमेडी शोमध्ये कोणते नवे कलाकार?

डॉ. निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदवीर शो मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे  लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. तर या कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी प्रत्येक एपिसोडमध्ये असणार आहेत. हा कार्यक्रम येत्या 27 एप्रिलपासून  शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.  

ही बातमी वाचा : 

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांचे फोटो समोर, केंद्रीय तपास यंत्रणांना लागला महत्त्वाचा सुगाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Embed widget