(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi Season 5 : 'महाराष्ट्र आता वेळ आलीये, हा थर्ड क्लास शो बघणं बंद'; आर्याच्या बाबतीत बिग बॉसने घेतलेला निर्णय प्रेक्षकांना अमान्य
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरातून आर्याची हकालपट्टी करण्यात आली असून त्यावर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) आर्याने (Arya Jadhav) निक्कीच्या (Nikki Tamboli) कानाखाली मारली आणि तिची हकालपट्टी करण्यात आली. आर्या आणि निक्कीमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमध्ये आर्याचा संयम सुटला. त्यावेळी तिने मी तुला मारेन असं निक्कीला म्हटलं, त्यानंतर तिने निक्कीवर हात उचलला. बिग बॉसने सुरुवातीला आर्याला जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. पण भाऊच्या धक्क्यावर अंतिम निर्णय घेत आर्याला घराबाहेर काढण्यात आलं आहे. यावर बिग बॉस प्रेमींनी तीव्र रोष व्यक्त केलाय.
आर्याला बिग बॉसने तिने केलेल्या हिंसेनंतर चांगलच झापलं. दरम्यान आर्यानेही तिने केलेल्या चुकीची माफीही मागितली. पण तरीही बिग बॉसने मुलभूत नियमाचं उल्लंघन केल्याने तिला घराबाहेर काढण्यात येत असल्याचा निर्णय सुनावला.
आर्याला बाहेर काढल्यानंतर प्रेक्षकांचा रोष
दरम्यान अनेकांनी कमेंट्स करत बिग बॉसच्या या निर्णयावर संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.'महाराष्ट्र आता वेळ आली आहे.... सगळ्यांनी जनतेची ताकद दाखवा... कलर्स मराठी बंद...जिओ सिनेमा, जिओ टीव्ही बंद..., बिग बॉस बघणं बंद करा, आर्या आणि अरबाजला ट्रॉफी द्या आणि बाकी लोकांना बाहेर काढा एवढंच राहिल आहे.. आजपासून बिग बॉस बघणं बंद, बायस बिग बॉस बायस होस्ट, आर्याला बाहेर काढलं त्यामुळे आजपासून हा थर्ड क्लास शो बघणं बंद...'
बिग बॉसने जाहीर केला निर्णय
भाऊच्या धक्क्यावर अंतिम निर्णय घेताना बिग बॉसने म्हटलं की, 'कॅप्टन्सी कार्यातलं फुटेज वारंवार पाहिल्यानंतर लक्षात आलं की, आर्या निक्कीमध्ये धक्काबुक्की झाली. निक्कीचा आर्याला धक्का लागला आणि आर्याने हात उचलला. आर्याने केलंल कृत्य बिग बॉसच्या मुलभूत नियमांचं उल्लंघन. बिग बॉसच्या घरात या हिंसेचं समर्थन कधीच केलं जाणार नाही', असं म्हणत बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं आहे.
View this post on Instagram