एक्स्प्लोर
Advertisement
'नटसम्राट' पुन्हा रंगभूमीवर, मुख्य भूमिकेत...
रंगभूमीवर आता मोहन जोशी ‘नटसम्राट’चं आव्हान पेलणार आहेत.
मुंबई : 'नटसम्राट'च्या रुपाने 'झी मराठी' आणखी एक अजरामर नाट्यकृती पुन्हा रंगभूमीवर आणत आहे. 'कुणी घर देता का घर?' अशी आर्त साद देत हिंडणाऱ्या आप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेते मोहन जोशी दिसणार आहेत. येत्या दिवाळीत नाटकाचा भव्य शुभारंभ होणार आहे.
विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या शोकांतिकांवरुन प्रेरित होऊन साहित्यऋषी वि. वा. शिरवाडकर यांनी 'नटसम्राट' हे नाटक लिहिलं. सत्तरच्या दशकात या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास रचला. आजवर यशवंत दत्त, सतीश दुभाषी, दत्ता भट, श्रीराम लागू, उपेंद्र दाते यांनी गणपतरावांची व्यक्तिरेखा साकारली.
मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर या नाटकाचं गारुड कायम असल्याची प्रचिती काही वर्षांपूर्वी आली. महेश मांजरेकरांची निर्मिती असलेल्या 'नटसम्राट' या चित्रपटात दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका साकारली. रंगभूमीवर आता मोहन जोशी ‘नटसम्राट’चं आव्हान पेलणार आहेत.
कावेरीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी असतील, तर हृषिकेश जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत. सुशील इनामदार, भक्ति देसाई, श्वेता मेहेंदळे अशा कलाकारांची फौज नाटकात दिसेल.
झी मराठीने आतापर्यंत हॅम्लेट, अलबत्या गलबत्या यासारख्या नाट्यकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. तर आरण्यक, एका लग्नाची पुढची गोष्टी ही नाटकं येऊ घातली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement