एक्स्प्लोर

रविवारी रंगणार 'नाचू कीर्तनाचे रंगी' मकरसंक्रांत विशेष सोहळा, कीर्तनकार शिवलीला पाटील करणार निरूपण

Naachu Kirtanache Rangi : 'नाचू कीर्तनाचे रंगी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण सणांची महती सांगितली जाणार आहे.

Naachu Kirtanache Rangi : गेले दोन वर्ष प्रत्येक जण कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली वावरत आहे. अजूनही याचे सावट दूर झालेले नाही. या सावटामुळे सण साजरे करण्याची मजा  प्रत्येकजण हरवून बसला आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना घरबसल्या सणाचा आनंद मिळावा या उद्देशाने झी टॉकीजने 'नाचू कीर्तनाचे रंगी' या कीर्तनाच्या आगळयावेगळया सोहळयाच्या भक्तीरसाची भावपूर्ण मेजवानी प्रेक्षकांना देण्याचे ठरविले आहे. 

कीर्तनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. संतांच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।' असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी अभंग, संतवाणी, कथा, दैनंदिन घडामोडी यांच्या आधाराने निरुपण करत समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा तसेच चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही परंपरा जपत महत्त्वाच्या धार्मिक सणांचं औचित्य साधत 'नाचू कीर्तनाचे रंगी' हा कीर्तनाचा विशेष सोहळा रंगणार आहे.

जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरुवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. सौभाग्यवती स्त्रियांचा हा अतिशय महत्त्वाचा सण. या सणाला सौभाग्यवती स्त्रिया वाण देतात. 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असं म्हणत आपल्या स्नेहसंबंधातील कटुता नष्ट करुन मैत्रीचे बंध निर्माण करायचे व एकमेकांना चांगली दिशा दाखवायची हा या सणामागचा उद्देश. याच उद्देशाने 'नाचू कीर्तनाचे रंगी' या सोहळयातून संताच्या वाणीचे गोड विचार ऐकायला मिळणार आहेत.

'नाचू कीर्तनाचे रंगी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण सणांची महती सांगितली जाणार आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिला कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचे निरूपण रंगणार आहे. शिवलीलाताई पाटील यांच्या ओघवत्या शैलीतील कीर्तनातून लोकरंजनाचा वसा जपला जाणार आहे. भक्ती आणि मनोरंजनाचा मिलाफ साधत आणलेला 'नाचू कीर्तनाचे रंगी' हा विशेष सोहळा प्रेक्षकांना निश्चितच आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरेल.

संबंधित बातम्या

Shahrukh Khan New Film : किंग खान परत येतोय! शाहरुखच्या नव्या चित्रपटाची घोषणा 26 जानेवारीला होण्याची शक्यता

Acharya Postponed : कोरोनामुळे 'आचार्य' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे

Bade Achhe Lagte Hain 2 : राम आणि प्रियाची गोष्ट 100 एपिसोड्सची झाली, नकुल आणि दिशाने व्यक्त केली नवी आशा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Embed widget