एक्स्प्लोर

खऱ्या आयुष्यातला प्रसंग जेव्हा पडद्यावर साकारला जातो... 'किरण ऑटोमोटिव्ह' ते 'विलास ऑटोमोबाईल्स', जबराट संघर्षाचा भन्नाट प्रवास!

'मुलगी झाली हो' मालिकेत विलास पाटीलची भूमिका साकारणाऱ्या किरण माने यांनी हळव्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मुंबई : स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो' मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मालिकेत माऊचं साजिरी असं नामकरण झालं आहे. तिच्या वडिलांनी तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला आहे. त्यामुळे मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे. आता तर साजिरीने आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विलास ऑटोमोबाईल्स नावाने छोटंस दुकान थाटलं आहे. साजिरीने वडिलांचं आयुष्य खऱ्या अर्थाने साजरं केलं आहे. 'मुलगी झाली हो' मालिकेतला हा अत्यंत भावनिक प्रसंग विलास पाटील ही भूमिका साकारणाऱ्या किरण मानेंच्या खऱ्या आयुष्याशी साधर्म्य साधणारा आहे. हा भावनिक प्रसंग शूट करताना किरण माने यांच्यासमोर जुन्या दिवसांचा अल्बम उलगडला. यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली.

संघर्षांच्या दिवसांबद्दल सांगताना किरण माने म्हणाले, 'लै भयाण दिवस होते ते भावांनो...नाटक-अभिनयाचा 'नाद' सोडून गुपचूप सातारला येऊन, हायवेला वाढे फाट्यावर 'किरण ऑटोमोटिव्ह' हे दुकान टाकून बसायला लागलं होतं. जवळपास सतरा-अठरा वर्षांपुर्वीची गोष्ट... लै दोस्तांना म्हायतीय.. पन नविन दोस्तांसाठी परत एकदा. कारन बी तसंच हाय. सातार्‍यात हायवेवरच्या माझ्या इंजिन ऑईलच्या दुकानात बसलोवतो ...मनाविरूद्ध नाटक - अभिनय सोडून 'इंजिन ऑईल'च्या धंद्यात अक्षरश: घुसमटलोवतो...दुर्दैवानं दुकान भारी चालू लागलं आनी जास्तच अडकलो.. 'पैसा का पॅशन'?? डोकं भिर्रर्रर्र झालंवतं... पायाला भिंगरी लागलेल्या माझ्यासारख्या भिरकीट डोक्याच्या पोराचं बूड एके ठिकानी स्थिर झाल्यामुळं घरातले सगळे मात्र लैच आनंदात होते. तर एक दिवस दुकानात हिशोबाची वही काढताना अचानक आदल्या दिवशीच्या पेपरचं रद्दीसाठी काढून ठेवलेलं एक पान पायाशी पडलं...छोट्या जाहीराती असलेलं ते पान होतं. मी ते परत वर ठेवलं. परत कायतरी करत असताना बहुतेक फॅनच्या वार्‍यानं ते पान परत खाली पडलं...आता लैच गडबडीत असल्यामुळं मी ते पान टेबलवर ठेवलं...नंतर जेवनाच्या वेळी टिफीनखाली त्यो पेपर घेताना त्यावर 'पं. सत्यदेव दूबे' अशी अक्षरे दिसल्यासारखी झाली... आग्ग्गाय्यायाया.. डोळं चमाकलं.. कुतूहल चाळवलं ! पुण्यातल्या 'समन्वय'तर्फे पं. सत्यदेव दुबे यांची 'अभिनय कार्यशाळा' आयोजित करन्यात आलीवती..ती तीन-चार ओळींची लै छोटी जाहीरात होती. माझ्या मनात काहूर माजलं... च्यायला आपन काय करतोय हितं? काय करनारंय पुढं हे दुकान चालवून ?? आयुष्यात 'नाटक' नसंल - 'अभिनय' नसंल तर काय अर्थय जगण्यात??? अशा विचारांनी डोक्याचा भुगा झाला. एवढ्यात शेजारपाजारचे दुकानदार - मॅकेनिक यांच्या हाका ऐकू आल्या "ओ किरनशेठ ,या जेवायला"... अंगावर सर्रकन काटा आला ! हितनं पुढं आयुष्यभर माझी ही वळख असनारंय का ? किरणशेठ? ह्यॅट ..अज्जीब्बात नाही ! मी तसाच न जेवता उठलो , 'समन्वय' च्या संदेश कुलकर्णीला फोन लावला..आणि दुकानाला कुलूप लावलं ! (ते कुलूप नंतर उघडलंच नाही , आजपर्यंत !) मुलगी झाली हो मालिकेत माऊनं विलाससाठी उभ्या केलेल्या 'विलास ऑटोमोबाईल्स'चा जो सिन बघाल, तो करत असताना... मी ते दुकान पाहिलं आहे. इंजिन ऑईल्सचे कॅन्स पाहिले आहेत. तो ऑईल-ग्रीसचा गंध आला आणि या अठरा वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींनी मनात गर्दी केली... मी पाणावलेले डोळे लपवत होतो.. तिथं उपस्थित असलेल्या कलाकारांमध्ये एकजण असा होता, ज्यानं माझं ते दुकान आणि तो प्रवास जवळून पाहिला आहे. तो म्हणजे अशोकची भूमिका करणारा संतोष पाटील. त्यानं माझे पाणावलेले डोळे टिपले आणि आठवणीतल्या 'किरणशेठ'ला घट्ट मिठी मारली.'

...'किरण ऑटोमोटिव्ह' ते 'विलास ऑटोमोबाईल्स'.. जबराट संघर्षाचा भन्नाट प्रवास ! ...उद्या 'स्टार प्रवाह'वर 'मुलगी झाली हो'...

Posted by Kiran Mane on Thursday, 15 April 2021

किरण माने यांच्या संघर्षाचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. 'मुलगी झाली हो' मालिकेत ते साकारत असलेल्या वडिलांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. बाप-लेकीच्या नात्यातले अनेक भावनिक प्रसंग मालिकेच्या यापुढील भागातही पाहायला मिळणार आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?

व्हिडीओ

Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Embed widget