Me Honar Super Star Jallosh Juniors Cha : सुपरस्टार होण्याचं स्वप्न झालं साकार! पुण्याच्या सई आणि शरयू ठरल्या 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'च्या महाविजेत्या
Me Honar Super Star : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा या कार्यक्रमाचा नुकताच महाअंतिमसोहळा पार पडला असून पुण्याच्या सई आणि शरयू या पर्वाच्या महाविजेत्या ठरल्या आहेत.
Me Honar Super Star Jallosh Juniors Cha Winner : 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'चा (Me Honar Super Star Jallosh Juniors Cha) या लोकप्रिय कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला आहे. पुण्याच्या सई आणि शरयू या पर्वाच्या महाविजेत्या ठरल्या आहेत. सई जगताप आणि शरयू सोळंकीवर चाहते आता शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. सागर आणि दिव्येश, झीरो डिग्री क्रू ग्रुप, डी टू डी क्वीन्स ग्रुप, श्रीमयी सूर्यवंशी, सई आणि शरयू यांच्यामध्ये अंतिम लढत रंगली होती. या लढतीत पुण्याच्या सई आणि शरयू यांनी बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते ठरले जळगावचे सागर आणि दिव्येश.तृतीय क्रमांकाचा मान कल्याणच्या झीरो डिग्री क्रू ग्रुप आणि कराडच्या डी टू डी क्वीन्स ग्रुप यांना विभागून देण्यात आला.
श्रीमयी सूर्यवंशीचा उल्लेखनिय कामगिरीबद्दल गौरव
'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यादरम्यान श्रीमयी सूर्यवंशीला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. महाअंतिम सोहळ्यातील विजेत्या सई आणि शरयू यांना पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. या खास सोहळ्यात सई आणि शरयूला 'शुभविवाह' मालिकेतील भूमीनेही साथ दिली होती.
View this post on Instagram
इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळालं : सई आणि शरयू
विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना सई आणि शरयू म्हणाल्या,"हा सारा प्रवास स्वप्नवत आहे. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली होती. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने अंकुश चौधरी, फुलवा खामकर आणि वैभव घुगे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं".
ऑडिशन ते विजेतेपद; थक्क करणारा सई आणि शरयूचा प्रवास
सई आणि शरयू या दोघीही पुण्यातल्या गौरव डान्स अकादमीमधून नृत्याचं शिक्षण घेत आहेत. याच दरम्यान त्यांना 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'चा कार्यक्रमाविषयी कळलं आणि त्यांनी ऑडिशनसाठी थेट मुंबई गाठली.ऑडिशन ते विजेता हा त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. नृत्याची आवड आणि दोघींमधल्या घट्ट मैत्रीने सई आणि शरयूला विजेतेपदापर्यंत पोहोचवलं. इतक्या लहान वयात मिळालेलं हे घवघवीत यश त्यांचा पुढील प्रवास अधिक तेजोमय करेल हे नक्की. सई आणि शरयू जरी या पर्वाच्या विजेत्या असल्या तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे.
संबंधित बातम्या