Mazi tuzi reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परी अवघ्या काही आठवड्यात झाली लोकप्रिय, जाणून घ्या परी आहे तरी कोण?
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील मायराचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे
Mazi tuzi reshimgath : छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळे आशयाच्या मालिका होताना दिसून येत आहेत. त्यातील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे. मालिकेचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढण्याचे कारण म्हणजे मालिकेतील बालकलाकार 'परी' आहे. परीचे खरे नाव मायरा वायकूळ असे आहे. केवळ सव्वाचार वर्षांच्या परीने मालिका सुरू होताच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मायराचे स्वत:चे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. त्यामुळे सोशल मीडियावर देखील तिचा चाहतावर्ग झपाट्याने वाढत आहे.
ऑनस्क्रीन मायलेक असणाऱ्या प्रार्थना आणि मायराचं खास नातं
मालिकेतील नेहा आणि परीचे सीन नेहमीच प्रेक्षकांना भावतात. कधी हसवताना तर कधी डोळ्यात पाणी आणणारे सीन त्या करत असतात. सेटवरसुध्दा त्या दोघी धम्माल करत असतात. तसेच त्या दोघींचे रिल्सदेखील सोशल मीडियावर गाजत असतात. काल पार पडलेल्या कन्यादिनी त्यांनी 'अपने पास बहोत पैसा है" म्हणत फोटोशूट केले आहे.
मायरा सेटवर करत असते दंगा
मायरा मालिकेत समजुतदार, समजंस, थोडीशी मस्तीखोर, लबाड दाखवली आहे. त्याचपध्दतीने ती खऱ्या आयुष्यातदेखील आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या सेटवर मायराचा सतत दंगा सुरू असतो. तिचं सेटवरील प्रत्येकासोबत वेगळं कनेक्शन आहे. सेटवरील प्रत्येकासोबत ती आदराने आणि तितक्याच आत्मियतेने बोलत असते. तिला सांगितलेली कोणतीही गोष्ट तिच्या लक्षात राहत असते. मायराला सेटवर कधीच कंटाळा येत नाही. नवनवीन गोष्टी ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असते. तिची सेटवरील सगळ्यांसोबत चांगलीच गट्टी झालेली आहे. मायराची ही पहिलीच मालिका आहे.
मायराचे युट्यूब चॅनल
युट्यूबवर 'मायरास कॉर्नर' नावाचे मायराचे युट्युब चॅनल आहे. त्यावरील तिचा चाहतावर्ग लाखांच्या घरात आहे. त्यावर मायरा योगा करताना, खेळताना, घरच्यांसोबत वेळ घालवताना, केक बनवताना दिसून येते. मायराचे सोशल मीडिया अकाउंट तिचे आई-वडील सांभाळतात. युट्यूब चॅनलमुळे लहानपणापासूनच तिला कॅमेरा फेस करण्याची सवय आहे. मायरा आणि तिचे आई-वडील अनेकदा सारख्या रंगाचे कपडे घालतात. मायरा आणि तिची आई अनेकदा फोटोशूट करत असतात. मायराचा हळदीकुंकू समारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता.