(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मटा सन्मान 2022' पुरस्काराची नामांकन यादी जाहीर; ABP Majha च्या 'मन सुद्ध तुझं' ला सर्वोत्कृष्ट मालिका आणि दिग्दर्शक विभागात नामांकन
'मन सुद्ध तुझं' (Man Suddha Tuza) या मालिकेला मटा सन्मान 2022 (Mata Sanman 2022) पुरस्कारांत 'सर्वोत्कृष्ट मालिका' आणि 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' या दोन विभागात नामांकन मिळालं आहे.
Man Suddha Tuza : 'एबीपी माझा' वाहिनीवरील 'मन सुद्ध तुझं' (Man Suddha Tuza) या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मालिकेत नांदेडचे प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांच्या पुस्तकातील कथा दाखविण्यात आल्या. या मालिकेला मटा सन्मान 2022 पुरस्कारांत 'सर्वोत्कृष्ट मालिका' आणि 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' या दोन विभागात नामांकन मिळालं आहे.
'मानसिक आरोग्य' हा विषय मांडणारी मालिका-'मनं सुद्ध तुझं'
मालिकेचं दिग्दर्शन प्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं आहे. मालिकेत स्वप्नील जोशी, शरद पोंक्षे, प्रतिक्षा लोणकर, नीना कुलकर्णी, सुनील बर्वै, श्रीकांत यादव, प्रसाद खांडेकर, पुष्कर श्रोत्री, मानसी कुलकर्णी, सई रानडे अशा अनेक नामवंत मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या. या मालिकेमध्ये मानसिक आरोग्याचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं. तसेच डॉ. नंदू मुलमुले यांना प्रदीर्घ प्रॅक्टीस दरम्यान वेगवेगळी माणसं भेटत होती. त्यांच्या मानसिक गुंतागुंतीच्या समस्या या मालिकेत दाखवण्यात आल्या. मानसिक आरोग्य या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित असणाऱ्या या मालिका प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता मटा सन्मान 2022 या पुरस्कारासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या विभागाचे नामांकन मिळाले तर 'सर्वोत्कृष्ट मालिका' या विभागात देखील या मालिकेला मानांकन मिळालं आहे.
मटा सन्मान पुरस्कार 2022 मानांकनं जाहीर
मटा पुकस्कार 2022 साठी मानांकन मिळालेल्या चित्रपट, मालिका आणि कलाकारांची यादी जाहीर झाली आहे. एबीपी स्टूडिओची सह-निर्माती असलेल्या 'कारखानीसांची वारी' या चित्रपटाला सर्वेत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन मिळाले आहे.
'मन सुद्ध तुझं' या मालिकेबद्दल विनोद जैतमहाल यांनी लिहिलेले ब्लॉग-
BLOG | ॲनिमा - ॲनिमस (उत्तरार्ध)
BLOG : हिरव्या देठाची पिवळी केळी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha