Masterchef India 7 : ‘मास्टरशेफ इंडिया-7’ च्या विजेत्याचं गावात जंगी स्वागत; चाहत्यांचे प्रेम पाहून नयनज्योती सेकिया झाला भावूक, व्हिडीओ व्हायरल
'मास्टरशेफ इंडिया सीझन 7' (Masterchef India 7) ची ट्रॉफी जिंकून नयनज्योती सेकिया (Nayanjyoti Saikia) आपल्या गावी गेला. यावेळी नयनज्योतीच्या चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले.
Nayanjyoti Saikia Masterchef India 7 Winner : आसामच्या (Assam) तिनसुकिया येथील रहिवासी असलेल्या नयनज्योती सेकिया (Nayanjyoti Saikia) हा 'मास्टरशेफ इंडिया सीझन 7' (Masterchef India 7) चा विजेता ठरला. नयनज्योतीनं मास्टरशेफ इंडियामध्ये आपल्या कुकिंग स्किल्सनं अनेकांची मनं जिंकली होती. 'मास्टरशेफ इंडिया सीझन 7' ची ट्रॉफी जिंकून तो आपल्या गावी गेला. यावेळी नयनज्योतीच्या चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले.
नयनज्योती सेकियानं (Nayanjyoti Saikia) इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नयनज्योतीचे चाहते त्याचे स्वागत करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आलेले दिसत आहेत. चाहत्यांनी फुलांचा हार घालून आणि पुष्पगुच्छ देऊन नयनज्योतीचं स्वागत केलं. नयनज्योतीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, होमकमिंग... मी कृतज्ञ आहे आणि आनंदी आहे. मी सर्वांचे आभार मानतो.' नयनज्योती सेकियानं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
नयनज्योती सेकिया 'मास्टरशेफ इंडिया सीझन 7' (Masterchef India 7) या पर्वाचा विजेता ठरला आहे. नयनज्योतीला 25 लाख रुपयांचा चेक, ट्रॉफी आणि गोल्डन शेफचा कोट देण्यात आला आहे. नयनज्योतीने 'मास्टरशेफ इंडिया 7'मध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गोड पदार्थ ही नयनज्योतीची खासियत आहे.
'मास्टरशेफ इंडिया 7'चा विजेता नयनज्योती झाला असला तरी आसाममधील सांता सर्माने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. सांता आणि सुवर्णा यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा चेक आणि मेडल देण्यात आलं आहे. 'मास्टरशेफ इंडिया 7'च्या अंतिम टप्यात कमलदीप कौर, अरुणा विजय, प्रियंका कुंडी बिस्वास, सचिन खटवानी, गुपकीरत सिंह, सुवर्णा बागुल, संता सरमाह आणि नयन ज्योती हे आठ स्पर्धक पोहोचले होते.
नयनज्योतीनं कॉलेजपासूनच कुकिंग करायला सुरुवात केली. जेव्हा शेफ विकास खन्नानं त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले तेव्हा त्यानं नयनज्योतीला 'मास्टरशेफ इंडिया'साठी निवडले. सुरुवातीला नयनज्योतीच्या वडिलांना त्यानं मास्टर शेफमध्ये जावं, हे मान्य नव्हतं, पण नंतर विकासच्या विनंतीवरून त्यांनी शेवटी आपल्या मुलाला शोमध्ये पाठवले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: