एक्स्प्लोर

Marathi Serials : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ते 'तू चाल पुढं'; मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन

Marathi Serials : मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

Marathi Serials Ganeshotsav 2023 : घरोघरी गणपती बाप्पाचं (Ganeshotsav 2023) आगमन झालं आहे. आता मराठी मालिकांमध्येही (Marathi Serials) गणरायाचं आगमन झालं आहे. गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) निमित्ताने जवळ जवळ सगळ्याच मालिकेत तुम्हाला लाडके बाप्पा दिसतील आणि मालिकेत काय नवीन वळण येणार हे तुम्हाला ह्या आठवड्यात दिसून येईल.

अर्जुनची कोर्ट सुनावणी असल्याने त्याला ‘आजच शिक्षा होणार का?’ असा प्रश्न पडतो. त्याला घर व घरातल्या लोकांना सोडून जावं लागेल, ह्याची जाणीव होते. कोर्टात जाताना आप्पी त्याला विश्वास देते की, काहीही झालं तरी ती त्याच्यासोबत आहे. अर्जुन प्रेमाने अप्पीला  हरतालिकेचा उपवास सोडण्यासाठी डब्बा  पाठवतो आणि सोबत चिट्ठी पाठवतो. त्या चिट्ठीत अर्जुन आपल्या भावना व्यक्त करतो. आता बाप्पाचा आशिर्वादाने अर्जुन वरच हे संकट दूर होईल?

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत खोतांच्या घरात सुद्धा गणेश आगमनाची तयारी चालू आहे. रघुनाथ खोत स्वतः मातीचा गणपती तयार करुन त्याची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. तर खोतांच्या घरात गौरी आणण्याचा मान ह्यावेळी ओवीला मिळणार आहे.

'तू चाल पुढं' या मालिकेत अश्विनीची वार्षिक परीक्षा आहे आणि घरात गणपतीची तयारी पण चालू आहे. तिची सगळी धावपळ होत आहे. दरवर्षी प्रमाणे तिने मोदक बनवण्याची ऑर्डरदेखील घेतली आहे. या सर्व जवाबदाऱ्या अश्विनी विघ्नहर्त्याच्या साक्षीने पार पाडताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत अधिपती आणि अक्षराच्या घरीदेखील गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.

'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत कर्णिकांच्या घरी गणपती विराजमान होणार असून सगळ्यांची धांदल उडाली आहे. आनंदीची गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर पूर्ण करण्याची घाई आहे. यातच तिच्या हाताला जखम होते आणि पूर्ण कुटुंब तिच्या मदतीला धावून येतं. '36 गुणी जोडी' या मालिकेत  वानखेडेंच्या घरात जल्लोषात गणेश चतुर्थी साजरी होणार असून अमुल्या आणि वेदांताचे कुटुंब जवळ येणार आहे.

राजवीर - मयूरी जाणार टिटवाळा गणपतीच्या दर्शनाला

बोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतील राजवीर आणि मयूरी यांची हटके जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गणेशोत्सवात राजवीर सराफ याच्या घरचे टिटवाळा येथील पुरातन कालीन सिद्धिविनायक महागणपती मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी जातात. शकुंतला आणि दुष्यंत यांच्या प्रेमाचा एकमेव साक्षीदार असलेल्या या महागणपतीस विवाहविनायक असे म्हटले जाते. यंदा राजवीर देखील आपल्या कुटुंबा सोबत महागणपतीच्या दर्शनाला जाणार आहे; आणि राजवीर सोबत भाऊसाहेब म्हणजे बॉडीगार्ड देखील जातो. 

राजवीरला मात्र मयूरी आपल्या सोबत असती तर कीती छान झाल असतं ? असा विचार करतो. तेव्हा असं काहीतरी तरी घडतं की भाऊसाहेब वेश बदलून मयूरीच्या वेशात येतो, अन् राजवीर आणि मयूरी दोघेजण एकत्र या गणपतीच्या दर्शनाला जातात. राजवीर - मयूरी एकत्र गणपतीच्या दर्शनाला गेल्यावर नक्की काय होतं? मालिकेत पुढे काय होणार? आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने  मयूरी आणि राजवीर एकत्र येतील का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिकाच पाहावी लागेल.

संबंधित बातम्या

Swapnil Joshi : रस्ता झाडणे, मांडव घालणे, स्पर्धा, प्रसाद, आरत्या... स्वप्नील जोशीला आजही आठवतो गिरगावातला गणेशोत्सव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget