Sukh Mhanje Nakki Kay Asta: शिर्के-पाटलांच्या घरी होतोय देवीचा गोंधळ; 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष
'सुख म्हणजे नक्की काय असतं!' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे.
Sukh Mhanje Nakki Kay Asta: सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेला गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत जयदीप आणि गौरी यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचं काम शालिनी करत असते. आता नुकताच 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शिर्के-पाटील यांच्या घरी देवीचा गोंधळ होणार आहे. यावेळी शालिनी ही नंदिनी आणि गौरी यांच्याविरुद्ध जयदीपला भडकवताना दिसणार आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, सर्व गोंधळी हे शिर्के-पाटील कुटुंबाच्या घरी आले आहेत. गौरी ही सर्वांना चहा देते. त्यानंतर देवीच्या आरतीला सुरुवात होते. गौरी ही देवीची आरती करत असते. तेव्हा तिला काही वेळासाठी देवीची मूर्ती दिसत नाही. त्यामुळे गौरीला काळजी वाटते.
'सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेच्या प्रोमोच्या शेवटी दिसत आहे की, देवीचा गोंधळ सुरु असतानाच शालिनी ही जयदीपकडे जाते आणि त्याल सांगते की, नंदिनी आणि गौरी यांनी देवीच्या गोंधळाचे आयोजन केलं, हे तिला पटलं नाही. यावर जयदीप देखील चिडतो.
'सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दिसलं की, गौरी आणि जयदीप यांना त्रास देण्यासाठी शालिनी ही तंत्र विद्येचा आधार घेणार आहे. आता गौरी आणि जयदीप यांच्या आयुष्यात शालिनी कोणते अडथळे निर्माण करणार? हे 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना समजेल.
View this post on Instagram
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील कलाकार
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक या मंगल ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तसेच या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत.