Telly Masala : गौतमीच्या कार्यक्रमात साप आल्याने गोंधळ ते आमच्या टोलचे पैसे गेले कुठे? असा प्रश्न विचारणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर कारवाई; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Gautami Patil : गौतमीच्या कार्यक्रमात साप आल्याने गोंधळ; खुर्च्यांची तोडफोड करत तरुणांचा धिंगाणा
Gautami Patil : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावलं आहे. तरुणांसह, लहान मुले आणि वयोवद्धांनाही गौतमीने वेड लावलं आहे. आता गौतमीच्या नृत्याची सापालाही भूरळ पडल्याचं समोर आलं आहे. नवी मुंबईतील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात साप शिरला होता.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sara Kahi Tichyasathi : एकांकिका स्पर्धा ते मालिका; 'सारं काही तिच्यासाठी'ने दिला ब्रेक; जाणून घ्या अभिनेता अभिषेक गावकरबद्दल...
Abhishek Gaonkar On Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत अभिषेक गावकर (Abhishek Gaonkar) महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tejaswini Pandit : आमच्या टोलचे पैसे गेले कुठे? प्रश्न विचारणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर कारवाई, सोशल अकाऊंट्स टार्गेट!
Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. टोल वाढीवरुन (Toll Agigation) मनसे (MNS) आक्रमक झाले असून अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही आवाज उठवला आहे. तेजस्विनीच्या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. आता या ट्वीटनंतर तिचं सोशल मीडिया अकाऊंट टार्गेट करण्यात आलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aatmapamphlet Marathi Movie : चित्रपटाचं नाव ते गोष्ट; परेश मोकाशी आणि आशिष बेंडे यांनी सांगितली "आत्मपॅम्फ्लेट" सिनेमाची पडद्या मागची कहाणी!
Aatmapamphlet Marathi Movie : आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या मराठी चित्रपटाची सध्या चर्चा होता आहे. या चित्रपटाचं अनेक मराठी कलाकारांनी कौतुक केलं आहे. आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाच्या नावानं देखील अनेकांचे लक्ष वेधले. या चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी आणि दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी एबीपी माझाला एक खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाचे नाव, या चित्रपटाची गोष्ट या सर्व गोष्टींबाबत चर्चा केली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mitali Mayekar: "मराठी संस्कृती तुमच्या बुद्धीच्या..."; नेटकऱ्याची कमेंट; मिताली उत्तर देत म्हणाली, "संस्कृती आणि काम..."
Mitali Mayekar: अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. मिताली ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बिकिनी फोटोशूटमुळे चर्चेत आहे. मितालीनं काही दिवसांपूर्वी बिचवरील तिच्या फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. या फोटोला कमेंट करुन अनेकांनी तिला ट्रोल केलं. आता मितालीनं एक व्हिडीओ शेअर करुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.