Telly Masala : केदार शिंदेंचा पडद्यामागचा प्रवास ते प्राजक्तानं शेअर केला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील खास व्हिडीओ; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Prajakta Mali: प्राजक्तानं शेअर केला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील खास व्हिडीओ; म्हणाली, 'लाफ्टर थेरपी...'
Prajakta Mali: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्राजक्तानं या व्हिडीओला खास कॅप्शन देखील दिलं आहे.
Phirse Honeymoon: नवाजुद्दीन सिद्दीकी ते विद्या बालन; अमृता आणि संदेश यांच्या 'फिरसे हनिमून' नाटकाचं 'या' बॉलिवूड कलाकारांनी कौतुक
Phirse Honeymoon: अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) आणि अभिनेता संदेश कुलकर्णी (Sandesh Kulkarni) यांच्या पुनःश्च हनिमून या नाटकानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता हिंदी भाषेमधून हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. काही दिवसांपूर्वी पृथ्वी थिएटरमध्ये फिरसे हनिमून (Firse Honeymoon) या नाटकाचा प्रयोग झाला. अनेक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी हा प्रयोग पाहिला. त्यानंतर या कलाकारांनी या नाटकाचं कौतुक केलं.
Kedar Shinde : सही नाटकं आणि भारी चित्रपट, 'असा' आहे दिग्दर्शक केदार शिंदेंचा पडद्यामागचा प्रवास
Kedar Shinde : केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. केदार शिंदे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सिने-दिग्दर्शक असून त्यांनी अनेक मराठी सिनेमे, मालिका आणि नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे.
Neena Kulkarni: नीना कुळकर्णी यांची लव्ह स्टोरी माहितीये? पती होते प्रसिद्ध अभिनेते
Neena Kulkarni: मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. नीना कुळकर्णी यांनी 1980 मध्ये अभिनेते दिलीप कुळकर्णी यांच्यासोबत लग्न केले. दिलीप आणि नीना कुळकर्णी यांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊयात...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी केला ज्येष्ठ रंगकर्मींचा कृतज्ञता सन्मान; म्हणाले,"ही मदत नव्हे भेट"
Ashok Saraf : अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा नुकताच 75 वा वाढदिवस साजरा झाला असून त्यानिमित्ताने त्यांचं 'मी बहुरूपी' हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पुस्तकातून मिळालेला निधी त्यांनी वयोवृद्ध कलावंत आणि रंगमंच तंत्रज्ञ यांना दिला आहे.