एक्स्प्लोर

Telly Masala : 100 पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिला 'बाईपण भारी देवा'ते'खुप्ते तिथे गुप्ते' मध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सांगितला किस्सा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Baipan Bhaari Deva: 100 पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिला 'बाईपण भारी देवा'; केदार शिंदे म्हणाले, 'सिनेमा संपल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर...'

Baipan Bhaari Devaबाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. नुकतेच या चित्रपटाच्या स्पेशल शोचे आयोजन करण्यात आले होते. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः ‘पुरुष’ कर्मचाऱ्यांसाठी बाईपण भारी देवा चित्रपटाचा स्पेशल शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटातील कलाकार वंदना गुप्ते आणि सुकन्या कुलकर्णी मोने, दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde), सहनिर्माते अजित भुरे आणि जिओ स्टुडिओज मराठीचे कंटेंट हेड निखिल साने उपस्थित होते. या स्पेशल शोचा एक खास व्हिडीओ केदार शिंदे यांनी नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Subhedar Trailer: 'सुभेदार' चित्रपटाच्या ट्रेलरला दोन दिवसात दोन मिलियपेक्षा अधिक व्ह्यूज; चिन्मय मांडलेकरनं शेअर केली खास पोस्ट

Subhedar Trailer:  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांचा  'सुभेदार' (Subhedar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुभेदार या चित्रपटाची टीम सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. दोन दिवसांपूर्वी सुभेदार या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. दोन दिवसात या ट्रेलरला दोन मिलियपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. याबाबत नुकतीच अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यानं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Khupte Tithe Gupte: 'एका रिक्षावाल्यानं मला शिवी दिली...'; 'खुप्ते तिथे गुप्ते' मध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सांगितला किस्सा

Khupte Tithe Gupte:  अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte)  या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री  वंदना गुप्ते (Vandana Gupte) या हजेरी लावणार आहेत. हा एपिसोड प्रेक्षकांना 13 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना बघता येणार आहे. नुकताच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये वंदना गुप्ते या एक किस्सा सांगताना दिसत आहेत. 

Virajas Kulkarni: 'अजून खूप कष्ट घ्यायचे आहेत...'; नेटकऱ्यानं विचारलेल्या प्रश्नाला विराजस कुलकर्णीनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

Virajas Kulkarni: मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता  विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हा सध्या त्याच्या  'सुभेदार' (Subhedar)  या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. विराजस हा सुभेदार या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. विराजसनं सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या काही प्रश्नांची नुकतीच उत्तरं दिली आहे. विराजसनं दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Ameya Khopkar: "हा वाद ताबडतोब थांबायला हवा...."; अमेय खोपकर यांचा रणदीप हुड्डाला इशारा, शेअर केलं ट्वीट

Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच रणदीप हुड्डाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून अमेय खोपकर यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी स्वामित्वहक्कांवरुन सुरु झालेल्या वाद ताबडतोब थांबायला हवा, असा इशारा रणदीपला दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तरRiteish Deshmukh Vidhan Sabha Election : पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना रितेश देशमुखांचं आवाहनDhananjay Munde Puja :  धनंजय मुंडेंनी परळी वैद्यनाथाचा केला अभिषेकAmbadas Danve :  परिवर्तनासाठी मतदान करणं गरजेचं - अंबादास दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
त्यांनी 270-280 जागा जिंकतोय सांगायला पाहिजे होतं, शरद पवारांनी उडवली अजितदादांच्या दाव्याची खिल्ली
Maharashtra Assembly Election 2024 Live : नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
Embed widget