एक्स्प्लोर

Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."

Kareena Kapoor Khan Social Media Post: गुरुवारी रात्री, 16 जानेवारी रोजी, सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी हल्ला करण्यात आला. हल्लेखोरानं सैफवर चाकूहल्ला केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि सध्या तो रुग्णालयात दाखल आहे. अशातच आता करीना कपूरनं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे.

Kareena Kapoor Khan Post After Saif Ali Khan Stabbing Incident: गुरुवारचा दिवस बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीसाठी अत्यंत वाईट दिवस ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रात्रीच्या सुमारास बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या टॉप अॅक्टर्सपैकी एक असलेल्या सैफ अली खानवर (Saif Ali Khan) घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला होता. एखाद्या दिग्गज सेलिब्रिटीच्या थेट घरात घुसून त्याच्यावर हल्ला करून त्याला गंभीररित्या जखमी केल्यामुळे केवळ इंडस्ट्री नव्हे, तर देशभरात खळबळ माजली होती. 

वांद्रे (Bandra) येथील 'सत्गुरु शरण' इमारतीतील सैफच्या फ्लॅटमध्ये घुसलेल्या घुसखोर सर्वात आधी सैफच्या घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या खोलीत गेला. त्यानंतर महिला आणि त्याच्यात वादावादी सुरू झाली. हा आवाज ऐकून सैफ अली खान (Saif Ali Khan Injured) तिथे आला आणि त्यानं चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घुसखोरानं सैफवर चाकून वार केले. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि लगेचच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफवर हल्ला करणाऱ्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. अशातच नवऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पत्नी आणि दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खाननं (Kareena Kapoor Khan) सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

हल्लेखोर फक्त पैशाच्या उद्देशानं सैफ अली खानच्या घरात घुसला होता, असं सांगितलं जात आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात, घरात काम करणाऱ्या 56 वर्षीय नर्स एलियामा फिलिप यांनी सांगितलं की, हल्लेखोरानं त्यांच्याकडून 1 कोटी रुपये मागितले आणि त्यांनी विरोध केला तेव्हा त्यानं तिच्यावर काठी आणि ब्लेडनं हल्ला केला.

सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हणाली करिना? 

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आता करीना कपूरनं सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. तिनं लिहिलंय की, "आमच्या कुटुंबासाठी हा एक धक्कादायक आणि आव्हानात्मक दिवस होता आणि आम्ही अजूनही आमच्यासोबत घडलेल्या घटना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या कठीण काळातून जात असताना, मी आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करतो की, मीडिया आणि पापाराझींनी कोणताही अंदाज बांधणं आणि कव्हरेज टाळावं. आम्हाला तुमच्या आणि पाठिंब्याचा आदर आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

"हा आमच्या सुरक्षेसाठी धोका आहे" : करिना कपूर खान 

करिनानं सोशल मीडिया पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, "या प्रकरणाबाबत सातत्यानं होणारा तपास आणि अटेंशन आमच्या सुरक्षेसाठी एक धोका आहे. मी तुम्हाला विनम्रतेनं आवाहन करते की, तुम्ही आमच्या मर्यादेचा सन्मान करावा आणि आम्हाला ती स्पेस द्या,जी आम्हाला एक कुटुंब म्हणून सावरण्यासाठी आणि या कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी आवश्यक आहे. मी या संवेदनशील काळात तुमचं सामंजस्य आणि आपुलकीसाठी तुम्हाला अॅडव्हान्समध्ये धन्यवाद म्हणते."

सैफ आता धोक्याच्या बाहेर 

दरम्यान, सैफ अली खानला या घटनेच्या काही वेळातच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, सैफच्या मणक्याजवळ अडीच इंचाचा चाकूचा तुकडा अडकला होता, जो शस्त्रक्रिया करुन काढून टाकण्यात आला. तसेच, काही ठिकाणी प्लास्टिक सर्जरी देखील करण्यात आली. आता सैफच्या जीवीताला कोणताही धोका नसल्याचंही त्यांनी सांगितलं. 

पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Home Security : सैफच्या इमारती भवती CCTV ,चोख सुरक्षा तरीही आरोपी शिरला कसा?

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Saif Ali Khan Injured: सैफच्या मानेवर 10 सेमीची जखम, हातावर 10 वार, पाठीत धारदार शस्त्रही खुपसलं; मध्यरात्री 2 वाजता नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 17 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Embed widget