Telly Masala : ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर रिलीज ते अक्षया नाईकचं नवं नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीस; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Nana Patekar Exclusive : राजकारण्यांना चिमटे काढणं गरजेचं; 'त्या' ट्वीटमागची नाना पाटेकरांची भूमिका
Nana Patekar Tweet : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की,"मुनगंटीवार महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन.. जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर बघा". त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधान आलं. आरोप-प्रत्यारोप झाले. आता यावर नानांनी त्यांची भूमिका एबीपी माझाकडे व्यक्त केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Gashmeer Mahajani: 'कितीही दुर्लक्ष केलं तरी माझ्या मानगुटीवर बसून राहतं...'; गश्मीर महाजनीनं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष
Gashmeer Mahajani: अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सध्या चर्चेत आहे. गश्मीरनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. गश्मीरनं या पोस्टमध्ये त्यानं स्वप्नांचा उल्लेख केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Khupte Tithe Gupte: अजित पवार की देवेंद्र फडणवीस, कोण प्रभावी उपमुख्यमंत्री? गुप्तेंचा प्रश्न, ताईंचं उत्तर कुणाला खुपणार?
Khupte Tithe Gupte: छोट्या पडद्यावरील खुप्ते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी तसेच नेते मंडळी हजेरी लावतात. या कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांना अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) हा विविध विषयांवर आधारित प्रश्न विचारतो. नुकताच सोशल मीडियावर खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अवधूत गुप्ते हा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना काही प्रश्न विचारत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Teen Adkun Sitaram Trailer: पार्टीनंतर ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? रहस्य लवकरच उलगडणार ! ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर रिलीज
Teen Adkun Sitaram Trailer: काही दिवसांपूर्वी 'तीन अडकून सीताराम' (Teen Adkun Sitaram) या चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज झाला होता. टिझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटामधील डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Akshaya Naik : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईक नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; शेअर केला खास व्हिडीओ
Akshaya Naik : सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधील लतिका ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षया नाईक ही एका दोन अंकी नाटकामध्ये काम करणार आहे. एक खास व्हिडीओ शेअर करुन अक्षयानं तिच्या या नव्या नाटकाची माहिती चाहत्यांना दिली आहे.