Gashmeer Mahajani: 'कितीही दुर्लक्ष केलं तरी माझ्या मानगुटीवर बसून राहतं...'; गश्मीर महाजनीनं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष
Gashmeer Mahajani: गश्मीरनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Gashmeer Mahajani: अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सध्या चर्चेत आहे. गश्मीरनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. गश्मीरनं या पोस्टमध्ये त्यानं स्वप्नांचा उल्लेख केला आहे.
गश्मीरची पोस्ट
गश्मीरनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गश्मीरनं लिहिलं, 'एक स्वप्न आहे. ते रोज येतं. कितीही दुर्लक्ष केलं तरी माझ्या मानगुटीवर बसून राहतं. मी म्हणतो जा बाबा, माझ्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत! पण ते काही हलत नाही, जणू त्याचं माझ्याविना कुणीच नाही. मी काही देणं लागतो त्याचं असं म्हणतं ते मला. माझंच स्वप्न आहे ते. लहानपणापासून पाहायचो. तरुण होतं तेव्हा खूप उद्दाम होतं. म्हातारं झालं आणि लाचार झालं, अशी स्टोरी गश्मीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.'
गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा अनेकदा इन्स्टाग्रामवर 'Ask Gash' हे सेशन करतो. या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. गश्मीर आता लवकरच एक नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यानं या प्रोजेक्टची माहिती दिली. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, "पुन्हा एकदा तोच प्रवास...लवकरच"
View this post on Instagram
गश्मीरनं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम
गश्मीरनं काही मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सरसेनापती हंबीरराव, देऊळ बंद, कान्हा आणि कॅरी ऑन मराठा या मराठी चित्रपटांमध्ये गश्मीरनं काम केलं. तसेच त्यानं तेरे इश्क में घायल, इमली या हिंदी मालिकांमध्ये देखील गश्मीरनं काम केलं. आता गश्मीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
गश्मीरचे वडील अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. रवींद्र महाजनी यांनी 'जाणता अ जाणता' या मराठी नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'तो राजहंस एक' हे त्यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक रंगभूमीवर आलं. अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील रवींद्र महाजनी यांनी काम केले. रवींद्र महाजनी यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
संबंधित बातम्या
Gashmeer Mahajani: वडिलांच्या निधनानंतर केस कापण्याबद्दल चाहत्यानं विचारला प्रश्न; गश्मीर उत्तर देत म्हणाला, 'मी जर टक्कल केले असते तर...'