Majhi Tujhi Reshimgath : नेहा जाणार लंडनला; यश आणि चौधरी कुटुंब घेणार परीची काळजी
Majhi Tujhi Reshimgath : कंपनीच्या कामासाठी नेहा लंडनला जाणार आहे.
![Majhi Tujhi Reshimgath : नेहा जाणार लंडनला; यश आणि चौधरी कुटुंब घेणार परीची काळजी Majhi Tujhi Reshimgath Neha to go to London Yash and Chaudhary family will take care of the fairy Majhi Tujhi Reshimgath : नेहा जाणार लंडनला; यश आणि चौधरी कुटुंब घेणार परीची काळजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/1564d6603336c576c8a8a356081cccb5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आजोबांची तब्येत खालावल्याने नेहा आणि परी पॅलेसवर राहायला येतात. दरम्यान कंपनीच्या कामामुळे नेहाला लंडनला जावे लागते. त्यामुळे यश आणि चौधरी कुटुंब परीची काळजी घेणार आहेत.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या आगामी भागात नेहा आणि परीची ताटातुट झालेली पाहायला मिळणार आहे. नेहाला ऑफिसच्या कामासाठी लंडनला जावे लागते. त्यामुळे ती परीला यशच्या घरी सोडून जाणार आहे. दरम्यान यश आणि त्याचं कुटुंब परीची काळजी कशी घेणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
नेहा लंडनला गेल्यानंतर यश आणि त्याचं कुटुंब परीची योग्य काळजी घेऊ शकेल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
संबंधित बातम्या
Ravi Jadhav : 'नटरंग' ते 'टाइमपास 3'... कसा होता दिग्दर्शक रवी जाधव यांचा मराठी सिनेसृष्टीतील प्रवास? पोस्ट चर्चेत
Savaniee Ravindrra : गायिका सावनी रविंद्रचा मातृदिन खास, 'माँ कोई तुझसा नहीं' गाणं प्रदर्शित
Janhit Mein Jaari : 'जनहित में जारी' ट्रेलर आऊट; सामाजिक संदेश देणारा सिनेमा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)