एक्स्प्लोर

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' घेणार प्रेक्षकांचा निरोप? 'ही' मालिका होणार सुरू

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर या मालिकेच्या जागी '36 जुणी जोडी' (36 Guni Jodi) ही नवी मालिका सुरू होणार असल्याचा अंदाज आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. दरम्यान काही कारणाने या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका बंद होणार असल्याने चाहते नाराज झाले. त्यामुळे निर्मात्यांनी ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा घाट घातला. पण ही मालिका 8.30 ऐवजी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागली. 

'36 जुणी जोडी' या मालिकेचा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. पण प्रोमो रिलीज झाल्यापासून 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. '36 जुणी जोडी' ही मालिका झी मराठीवर 23 जानेवारीपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होत आहे. त्यामुळे आता 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका बंद होणार असल्याची दाट शक्यता आहे. 

'36 जुणी जोडी' या मालिकेत अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या माध्यमातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "36 गुण जुळले की जोडी जमते पण 36 चा आकडा असणाऱ्या जोडीचं काय करायचं", असं म्हणत झी मराठीने या मालिकेचा प्रोमो आऊट केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका बंद होणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका बंद केली तर आम्ही मालिका पाहणं बंद करू, कृपया 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका बंद करू नका, नवी मालिका सुरू करायची असेल तर दुसऱ्या मालिका बंद करा, अशा कमेंट्स आणि पोस्ट चाहत्यांनी केल्या आहेत.

संबंधित बातम्या

Trp : प्राइम टाइम संगे चाले टीआरपीचा खेळ; कसं ठरतं TRP चं गणित? जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळेABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget