Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवं वळण; यशसोबत लग्न केल्याचं खोट कारण नेहा आजोबांना सांगणार
Majhi Tujhi Reshimgath : नेहा आजोबांना यश सोबत लग्न केल्याचं खोटं सत्य सांगणार आहे.
![Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवं वळण; यशसोबत लग्न केल्याचं खोट कारण नेहा आजोबांना सांगणार Majhi Tujhi Reshimgath A new twist in the serial Majhi Tujhi Reshimgath Neha will tell her grandfather the false reason for marrying Yash Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवं वळण; यशसोबत लग्न केल्याचं खोट कारण नेहा आजोबांना सांगणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/29/530a3e6437e52a8882d670f7e3ff9e5a_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यश आणि नेहाच्या लग्नाला जग्गू आजोबांनी मान्यता दिली आहे.पण अचानक त्यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे आता नेहा आजोबांना यशसोबत लग्न केल्याचं खोटं कारण सांगणार आहे.
मालिकेच्या आगामी भागात सिम्मू काकू नेहाला यशसोबत लग्न केल्याचं खोटं कारण सांगायला सांगत आहे. त्याप्रमाणे नेहा आजोबांना यशसोबत लग्न केल्याचं खोटं कारण सांगते. दरम्यान विश्वजीत काका यशला त्याच्या आई-बाबांच्या मृत्यूचं भयानक सत्य सांगणार आहेत.
View this post on Instagram
मालिकेत सध्या नेहा आणि यशला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
संबंधित बातम्या
Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीच्या कंपनीतून संजनाला दाखवला जाणार बाहेरचा रस्ता, ‘आई कुठे काय करते’ मालिकेला नवं वळण!
RRR Box Office Collection Day 4: ‘आरआरआर’ने गाठला 500 कोटींचा टप्पा! हिंदी व्हर्जनचाही बॉक्स ऑफिसवर कल्ला!
Brahmastra Shoot Wrap : 5 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अखेर ‘ब्रह्मास्त्र’चं शूटिंग पूर्ण! दिग्दर्शक अयान मुखर्जीची खास पोस्ट...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)