Maharashtrachi Kitchen Queen : जमणार महाराष्ट्रभरातून सुगरणी, रंगणार चवींचा खेळ, 'महाराष्ट्राची किचन क्वीन' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maharashtrachi Kitchen Queen : 'महाराष्ट्राची किचन क्वीन' हा नवा चवदार आणि खमंग कार्यक्रम 15 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Maharashtrachi Kitchen Queen : छोट्या पडद्यावर खवय्यांसाठी अनेक खवय्येगिरीचे कथाबाह्य कार्यक्रम असतात. असच खवय्येगिरीला अजून रुचकर बनवण्यासाठी एक नवा खमंग असा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen) हा कार्यक्रम 15 मे पासून सुरु होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील (Maharashtra) सुगरणींमध्ये स्पर्धा रंगणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या खाद्यासंस्कृती देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
'महाराष्ट्राचा किचन क्वीन' या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकर्षण कऱ्हाडे करणार असल्यामुळे या प्रोमोमध्ये संकर्षण झळकत आहे. यामध्ये संकर्षण महाराष्ट्रातून आलेल्या सुगरणींची ओळख करुन देत आहे. विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातून या सुगरणी आल्या असल्याचं संकर्षण या प्रोमोमध्ये सांगत आहे. तसेच या तिघी मिळून ज्वारीची भाकरी, शेवभाजी आणि खमंग शेंगदाण्याची चटणी बनवणार असल्याचं संकर्षण म्हणाला आहे. 'कसा जमेल बेत, कशी असेल चव, खेळूया हा चवीचा खेळ नवीन, तिघींपैकी एक होणार महाराष्ट्राची किचन क्वीन' असं संकर्षण या प्रोमोमध्ये म्हणाला आहे. 'महाराष्ट्राची किचन क्वीन' हा कार्यक्रम येत्या 15 मे पासून सोमवार ते शनिवार दुपारी एक वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
'छोटी यशोदा' आता नव्या वेळेत येणार भेटीला
'किचन क्वीन' हा कार्यक्रम दुपारी एक वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यानं 'यशोदा गोष्ट श्यामच्या आई'ची ही मालिका 8 मे पासून संध्याकाळी सहा वाजता सुरु होणार आहे.
View this post on Instagram
तर आदेश भाऊजींची देखील वेळ आता बदलणार आहे. 'होम मिनिस्ट' हा कार्यक्रम 8 मे पासून संध्याकाळी 5.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram