एक्स्प्लोर

Maharashtrachi Hasyajatra : गणेशोत्सवानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमकडून खास भेट; सलग आठ दिवस होणार हास्याचा उत्सव

 Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधून या कार्यक्रमाच्या एपिसोड्सची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtrachi Hasyajatra 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या कार्यक्रमातील कलाकार विविध स्किट सादर करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. आता  गणेशोत्सवानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमनं प्रेक्षकांना खास गिफ्ट दिलं आहे. आता  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सलग आठ दिवस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच  'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधून या कार्यक्रमाच्या एपिसोड्सची माहिती देण्यात आली आहे.

 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसते की, शोमधील कलकार म्हणतात,  'गणपती बाप्पा मोरया, वाजतगाजत होणार बाप्पाचे आगमन आणि सुरु होणार हास्याचा उत्सव कारण  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' येणार 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर रोज रात्री नऊ वाजता.' 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर  यादरम्यान  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं, गणेशोत्सवानिमित्त खास भेट....! तुमची लाडकी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सलग 8 दिवस! टीव्हीसमोर बसू या, सहकुटुंब हसू या!'

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या प्रोमोमध्ये दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघुले आणि वनीता खरात हे कलाकार दिसले. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या कार्यक्रमामधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवायला सज्ज झाले आहेत.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या  कार्यक्रमाची टीम ही काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या  दौऱ्याला गेली होती.  या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडीओ कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमातील प्रियदर्शिनी इंदलकर, समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात हे कलाकार आपल्या विनोदीशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. तसेच या कार्यक्रमाचे परीक्षण सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक हे करतात. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोड्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

संबंधित बातम्या:

Prajakta Mali: प्राजक्तानं शेअर केला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील खास व्हिडीओ; म्हणाली, 'लाफ्टर थेरपी...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech :बीड ते तुर्की, मराठा ते वंजारी, हिंदू - मुस्लिम,शिवतीर्थवरील गाजलेले भाषणRaj Thackeray Speech : खालून प्रेत गेलं असेल एखादं...राज ठाकरंची तुफान फटकेबाजी ABP MAJHARaj Thackeray Speech : मुंबई पाच नद्या होत्या, चार मेल्या...मिठी नदी सुद्धा मरायला आली आहेRaj Thackeray Speech : कुंभमेळा, गंगा ते प्रदुषण...राज ठाकरेंचं सरकारवर पलटवार ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Hemant Nimbalkar : कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निंबाळकरांना मुख्यमंत्री पदक
कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निंबाळकरांना मुख्यमंत्री पदक
Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
Embed widget