Maharashtra Television News : ‘तुझेच मी गीत गात आहे’ ते 'अनुपमा'; तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? जाणून घ्या...
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...
Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Shreyas Talpade: 'आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊ प्रार्थना केली...'; जितेंद्र जोशीनं सांगितलेली आठवण ऐकून श्रेयस झाला भावूक
Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा हजेरी लावणार आहे. सध्या खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात श्रेयसचा मित्र अभिनेता जितेंद्र जोशी ( Jitendra Joshi) हा एक आठवण सांगतो. ती आठवण ऐकून श्रेयस हा भावूक होतो.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Anupamaa Spoiler Alert: शाह कुटुंबाच्या घरात खास व्यक्तीची होणार एन्ट्री; 'अनुपमा' मालिकेत काय घडणार? जाणून घ्या
Anupamaa Spoiler Alert: अनुपमा (Anupamaa) शोमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहेत. गुरुमा या समर आणि डिंपीच्या लग्नासाठी शाह कुटुंबाच्या घरी हजरे लावतात आणि अनुपमाला अमेरिकेतील त्यांच्या गुरुकुलची उत्तराधिकारी म्हणून घोषित करतात. जाणून घेऊया अनुपमा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय दाखवण्यात येणार आहे...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Pyaar Ka Pehla Adhyay: Shiv Shakti: ‘प्यार का पहला अध्याय: शिव शक्ती’ ही मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस; अर्जुन बिजलानी आणि निक्की शर्मा साकारणार प्रमुख भूमिका
Pyaar Ka Pehla Adhyay: Shiv Shakti: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) हा एका नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'प्यार का पहला अध्याय: शिव शक्ती' (Pyaar Ka Pehla Adhyay: Shiv Shakti) असं या मालिकेचं नाव आहे. 'प्यार का पहला अध्याय: शिव शक्ती'मालिकेच्या शूटिंगसाठी अर्जुन हा बनारसला गेला आहे. नुकताच अर्जुननं 'प्यार का पहला अध्याय: शिव शक्ती' या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tujhech Mi Geet Gaat Aahe : ‘तुझेच मी गीत गात आहे’ चे 300 भाग पूर्ण; मालिकेच्या टीमनं केलं खास सेलिब्रेशन
Tujhech Mi Geet Gaat Aahe : छोट्या पडद्यावरील 'तुझेच मी गीत गात आहे' (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता या मालिकेचे 300 भाग पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं या मालिकेच्या टीमनं सेलिब्रेशन केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
अरुंधती परत आल्याने सगळ्यांना झाला आनंद; 'आई कुठे काय करते !' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील अरुंधती परदेशी गेल्याचं दाखवण्यात आलं होतं. अरुंधती गेल्यानंतर मालिकेतील घडामोडींना मालिकाप्रेमी कंटाळलेले होते. आता अरुंधतीची मालिकेत एन्ट्री झाली आहे. अरुंधतीची मालिकेत एन्ट्री झाल्यानं सगळ्यांना आनंद झाला आहे. नुकताच 'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती ही अशुतोषचे आभार मानताना दिसत आहे.